एक्स्प्लोर

Amaal Malik On Industry Dark Side: वडील-चुलत्यांचं मोठं नाव, तरीही स्टारकीडला इंडस्ट्रीत मिळेना काम; खळबळजनक दावा करत म्हणाला, 'बॉलिवूडवाल्यांनी 60 फिल्म्समधून बाहेर काढलं...'

Amaal Malik On Industry Dark Side: सिनेसृष्टीतील नामांकित कुटुंबातून आलेल्या प्रसिद्ध गायकानं इंडस्ट्रीतील काही प्रभावशाली आणि अहंकारी व्यक्तींमुळे आपल्या करिअरमध्ये अनेक अडथळे निर्माण झाल्याचा दावा केला आहे.

Amaal Malik On Industry Dark Side: बॉलिवूडचं (Bollywood News) जग जेवढं झगमगतं, चमचमतं दिसतं, तेवढं ते प्रत्यक्षात नसतं, याची अनेक उदाहरणं आणि अनुभव इंडस्ट्रीतील दिग्गजांपासून अगदी ज्युनिअर आर्टिस्टपर्यंत अनेकांनी उघडपणे सांगितली आहे. आता याच यादीत एका प्रसिद्ध गायक (Famous Singer) आणि म्युझिक कंपोजरची (Music Composer) भर पडली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा प्रसिद्ध गायक एक स्टारकीड आहे. पण, तरीसुद्धा त्याच्या वाट्याला इंडस्ट्रीत स्ट्रगलच आल्याचं तो सांगतो. यासंदर्भात त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.  

सिनेसृष्टीतील नामांकित कुटुंबातून आलेल्या प्रसिद्ध गायकानं इंडस्ट्रीतील काही प्रभावशाली आणि अहंकारी व्यक्तींमुळे आपल्या करिअरमध्ये अनेक अडथळे निर्माण झाल्याचा दावा केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मोठं आडनाव आणि घराणेशाहीचाही आपल्याला कोणताही फायदा झाला नसल्याचं त्यानं स्पष्ट सांगितलं आहे. गायकानं कोणाचंही नाव न घेता अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानं सांगितलंय की, गेल्या काही वर्षांत त्याला अनेक सिनेमांमधून बाहेर काढण्यात आलं. तसेच, बॉलिवूडमध्ये काही विशिष्ट लोकांचा असा गट सक्रिय असून, तोच कलाकारांचं भविष्य आणि करिअर ठरवण्याचा प्रयत्न करतो, असंही त्यानं म्हटलं आहे. ज्या गायकानं ही खळबळ उडवून देणारी पोस्ट केलीय, तो गायक म्हणजे, अमाल मलिक. प्रख्यात भारतीय संगीत दिग्दर्शक, संगीतकार आणि अभिनेते डबू मलिक (Daboo Malik) यांचा मुलगा. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amaal Mallik (@amaal_mallik)

अमाल मलिकनं इन्स्टाग्रामवर लांबलचक पोस्ट (Amaal Mallik Shares Lengthy Post On Instagram) लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अमाल मलिकच्या आरोप करणाऱ्या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. रुपेरी पडद्यामागील ग्लॅमर आणि यशाच्या झगमगाटामागे कलाकारांना कोणत्या संघर्षांना सामोरं जावं लागतं, याविषयीही नव्यानं चर्चा सुरू झाली आहे. अनेक चाहत्यांनी या कलाकाराला पाठिंबा दर्शवत, त्याच्या आरोपांमागील सत्य जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे.

लांबलचक पोस्टमध्ये अमाल मलिक नेमकं काय म्हणाला? (Amaal Malik Allegation Bollywood)

आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये बोलताना अमाल मलिक म्हणाला की, "इंडस्ट्रीतील मोठ्या लोकांनी मला जवळपास 60 पेक्षा जास्त सिनेमांतून बाहेरचा रस्ता दाखवला. तर 20 सिनेमे मी स्वत:चं सोडले. कारण, तिथे काम करणं मला योग्य वाटलं नाही. एक संगीतकार म्हणून मला तिथे आदर मिळत नव्हता. पण मला याचा पश्चाताप नाही. कारण त्यांचं नुकसान झालं आहे. पण, या सगळ्याचा परिणाम कुठे ना कुठे तरी माझ्या चाहत्यांवरही पडतो. आणि यासाठीच मी त्यांची माफी मागतो. गेल्या 8 वर्षांपासून मी माझ्या परिने अत्यंत प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. पण, दुर्दैवाने त्याचा उपयोग झाला नाही"


Amaal Malik On Industry Dark Side: वडील-चुलत्यांचं मोठं नाव, तरीही स्टारकीडला इंडस्ट्रीत मिळेना काम; खळबळजनक दावा करत म्हणाला, 'बॉलिवूडवाल्यांनी 60 फिल्म्समधून बाहेर काढलं...

"इंडस्ट्रीचं हे सत्य मी लपवू शकत नाही, हे काही लोकांना पटत नाही. त्यामुळे माझ्या कुटुंबीयांनाही धमक्या मिळतात. असे काही पॉवरफूल लोक आहेत ज्यांना मला त्यांच्या सिनेमाचा भाग बनू द्यायचं नाही. त्यांना मला कुठल्याच सिनेमाचा भाग होऊ द्यायचं नाही. मला कोणाचीही नाव घेऊन बदनामी करायची नाही. पण, एक दिवस देव स्वत:चं त्यांना त्यांची जागा दाखवेल. गेल्या 8 वर्षांपासून त्यांची ही कारस्थानं सुरू आहेत. आणि त्यामुळेच तुम्हाला मी सिनेमात कमी गाताना दिसतो. नेपोटिझमचाही काही फायदा होत नाहीये. त्यामुळे तुम्ही मला माफ करा. कोणत्या सिनेमात माझं गाणं आलं तर ठीक, नाही आलं तर काळजी करू नका", असंही अमाल मलिकनं म्हटलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Netflix Documentary: 36 वर्षांची सुप्रसिद्ध गायिका, एकदा नाहीतर दोनदा मृत्यूच्या दाढेतून परतली, ब्रेस्ट कॅन्सरशी लढली; तरीही खंबीरपणे उभी राहिली

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Embed widget