एक्स्प्लोर

Siddharth Chandekar : 'त्यांना आईसाठी किती काय करावंस वाटतं हे जास्त महत्त्वाचं होतं....', आईसाठी जोडीदार निवडताना सिद्धार्थने 'या' गोष्टींचा केला विचार

Siddharth Chandekar : अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची आई आणि अभिनेत्री सीमा चांदेकर या नुकत्याच त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आल्या होत्या. यावर अभिनेत्याने एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं आहे.

Siddharth Chandekar :  अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) हा मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. नुकतच सिद्धार्थ श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्याच्या कामामुळे सिद्धार्थ कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो. पण काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगामुळे तो बराच चर्चेत आला. अनेकांनी त्याच्या या कृतीचं भरभरुन कौतुक केलं तर काहींनी थेट नापसंती दर्शवली. सिद्धार्थची आई आणि अभिनेत्री सीमा चांदेकर (Seema Chandekar) यांनी काही दिवसांपूर्वी लग्न केलं. वयाच्या 50 दुसरं लग्न करणं आणि मुलाने आईला या सगळ्यात खंबीर साथ देणं हा संपूर्ण प्रवास सिद्धार्थ सांगितला आहे. 

नुकतच सिद्धार्थने लोकमत फिल्मीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आईच्या दुसऱ्या लग्नाविषीय भाष्य केलं आहे. दुसरं लग्न करण्यासाठी सिद्धार्थने आईला कसं तयार केलं याविषयी देखील त्याने यावेळी सांगितलं. यासगळ्यामध्ये मितालीने त्याला कशी साथ दिली याविषयी देखील सिद्धार्थ व्यक्त झाला आहे. सुरुवातीला हे सगळं करताना मी फार घाबरलो होतो आणि आईने मला थेट नकार दिला होता, असं सिद्धार्थने यावेळी म्हटलं. 

आईने मला सरळ सांगितलं हे शक्य नाही - सिद्धार्थ चांदेकर

सुरुवातीला जेव्हा मला विचार आला तेव्हा मी पूर्ण घाबरलो होतो. कारण मी तिचा मुलगा जरी असलो तरी तिला रात्री जो संवाद साधायचा आहे, त्यासाठी ती काय करत असेल हा विचार माझ्या मनात यायचा.मी जेव्हा तिला हे सांगितलं तेव्हा तिने मला थेट नाही सांगितलं की हे शक्य नाही होणार. अर्थातच लोक काय विचार करतील हा विचार ती करत होती. तेव्हा मी तिला सांगितलं की, लोकं आपलं आयुष्य नाही जगणार आहेत. ते त्यांचं आयुष्य जगतायत. आपण इतक्या सगळ्यातून सावरलो पण आज आपलं काहीतरी उभं केलंय. काही झालं तर पुन्हा उभं करु. तेव्हा तिला वाटलं की हे करावं, असं सिद्धार्थने सांगितलं. 

मितालीने खूप प्रॅक्टिकल विचार केला - सिद्धार्थ चांदेकर

मितालीने या सगळ्यात सिद्धार्थला कशी साथ दिली यावर बोलताना सिद्धार्थने म्हटलं की, मिताली ही फार प्रॅक्टिकल मुलगी आहे. त्यामुळे मी अनेकदा भावनिक होऊन विचार करतो. पण ती मला नेमही कोणत्याही गोष्टीचा प्रॅक्टिकली विचार करायला लावते. तिने मला म्हटलं की, ठिक आहे तू हे सगळं करतोय पण तिला पुन्हा एकदा जर तिला यामध्ये त्रास झाला तर  काय करायचं. तेव्हा मला वाटलं की हो हा विचार करायला हवा, असं सिद्धार्थने म्हटलं. 

माझ्यासाठी ही गोष्ट जास्त महत्त्वाची होती - सिद्धार्थ चांदेकर

जेव्हा आमच्या भेटी झाल्या तेव्हा मला एक दोन भेटीतच कळलं की, ही व्यक्ती फार जेन्युइन आहे. ते आईसाठी किती काय काय करतील त्यापेक्षा त्यांना आईसाठी किती काय काय करावसं वाटतं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. त्यांच्या नजरेत मला ते कळालं. असं नाही झालं की ते आईला भेटले आणि त्यानंतर लगेचच लग्न झालं. साधारणपणे आमच्या 15 ते 20 भेटी झाल्या. त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी, आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी या सगळ्यावर चर्चा झाली. त्या सगळ्यावर चर्चा झाल्यानंतर एकदम प्रॅक्टिकली आणि भावनिक असा एकत्र होऊन हा निर्णय घेतल्याचं सिद्धार्थने सांगितलं.  

ही बातमी वाचा : 

Siddharth Chandekar : ते आहेत पण कुठेत हेच माहित नाही, म्हणून मी... सिद्धार्थ चांदेकर वडिलांबद्दल झाला व्यक्त 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
Embed widget