एक्स्प्लोर

Shriya Pilgaonkar : सरप्राईज! श्रियाची 'नवरा माझा नवसाचा-2' मध्ये खास भूमिका, म्हणाली, 'मी या सिनेमाचा भाग...'

Shriya Pilgaonkar : नवरा माझा नवसाचा-2 या सिनेमात श्रिया पिळगांवकर हिचा कॅमिओ रोल आहे. त्याविषयी श्रियाने नुकतीच पोस्ट केलीये.

Shriya Pilgaonkar in Navra Maza Navasacha 2 :  सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) दिग्दर्शित आणि निर्मित 'नवरा माझा नवसाचा-2' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जवळपास 19 वर्षांनी 'नवरा माझा नवसाचा' या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याही सिनेमात सचिन-सुप्रियाची एव्हरग्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पण सुरुवातीपासूनच एक प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. त्याच उत्तर स्वत: सचिन पिळगांवकर यांनी 'माझा कट्टा'वर दिलंही होतं. पण त्याचं उत्तर आता सोशल मीडियावरही प्रेक्षकांना मिळालं आहे. 

नवरा माझा नवसाचा या सिनेमात सचिन पिळगांवकर यांच्या लेकीच्या भूमिकेत श्रियाला का घेतलं नाही? असा प्रश्न विचारण्यात येत होता. पण आता प्रेक्षकांना हा सिनेमा पाहताना एक सरप्राईज मिळालं आहे. कारण नवरा माझा नवसाचा या सिनेमात श्रिया पिळगांवकर हिचा कॅमिओ रोल आहे. त्याविषयी श्रियाने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 

श्रियाने पोस्टमध्ये काय म्हटलं?

श्रियाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, सरप्राईज! नवरा माझा नवसाचा-2 या सिनेमामधली माझी ही खास भूमिका. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच तुम्ही सर्वांनी दिलेल्या असंख्य प्रतिक्रिया आणि शेअर केलेले व्हिडीओ पाहूनच मला खूप छान वाटलंय. सिनेमातील दिग्गज कलाकारांसोबतच मी या आयकॉनिक सिक्वेलचा भाग नसणं हे केवळ अशक्यच आहे. गणपतीचं हे गाणं मला खूप आवडलंय. तसेच नऊवारीमध्ये माझ्या सुंदर आईसोबत नाचणं आणि माझ्या बाबांचं दिग्दर्शन हे माझ्यासाठी खूपच खास होतं. सिनेमाच्या यशाचा मला खूप अभिमान आहे. तुम्ही या सिनेमाला तो प्रतिसाद देताय, त्यासाठी खूप धन्यवाद... गणपती बाप्पा मोरया...! नवरा माझा नवसाचा -2 तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत...

श्रिया मुलीच्या भूमिकेत का नाही?

मुलीच्या भूमिकेसाठी श्रियाची निवड का केली नाही, असा प्रश्न सचिन पिळगांवकरांना माझा कट्टावर विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं की,  मला या सिनेमात स्वप्नील जोशीला घ्यायचं होतं. तो या सिनेमात माझ्या जावयाची भूमिका करतोय. तोही मला माझ्या मुलासारखाच आहे. त्यामुळे श्रिया आणि त्याचं नातं हे बहिण भावासारखं आहे. म्हणून ते एकमेकांच्या अपोझिट भूमिकेत काम नाही करु शकत. त्यामुळे मी श्रियाला घेतलं नाही. तसंच जेव्हा या सिनेमाचं काम सुरु झालं, त्यावेळी तिच्याकडे खूप काम होतं, तिला वेळच नव्हता. म्हणून श्रियाला या सिनेमात घेतलं नाही.  

View this post on Instagram
 
A post shared by Shriya Pilgaonkar (@shriya.pilgaonkar)

ही बातमी वाचा : 

Sachin Pilgaonkar : तर 'त्या' भूमिकेसाठी श्रियाला का नाही घेतलं? सचिन पिळगांवकरांनी सांगितलं नवरा माझा नवसाचा-2मध्ये लेकीला न घेण्याचं कारण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्याAjit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Embed widget