Sachin Pilgaonkar : तर 'त्या' भूमिकेसाठी श्रियाला का नाही घेतलं? सचिन पिळगांवकरांनी सांगितलं नवरा माझा नवसाचा-2मध्ये लेकीला न घेण्याचं कारण
Sachin Pilgaonkar : सचिन पिळगांवकर यांचा नवरा माझा नवसाचा-2 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या सिनेमात त्यांनी श्रियाला का घेतलं नाही याचं कारण माझा कट्टावर सांगितलं आहे.
Sachin Pilgaonkar : जवळपास 19 वर्षांनी पुन्हा एकदा 'नवरा माझा नवसाचा-2' (Navra Maza Navsacha 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 20 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. त्यामुळे नवरा माझा नवसाच्या यशानंतर प्रेक्षकांनाही या सिनेमाची बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीमधील सुपरस्टार जोडी सचिन-सुप्रिया यांनी 'माझा कट्टा'वर (Majha Katta) संवाद साधला. यावेळी त्यांनी सिनेमातील अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंच पण सिनेमात त्यांची मुलगी श्रिया (Shriya Pilgaonkar) हिला त्या सिनेमात का नाही घेतलं याचंही कारण त्यांनी सांगितलं आहे.
या सिनेमाचं दिग्दर्शन, कथा, पटकथा, निर्मिती सगळं सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे. तसेच या सिनेमात सुप्रिया पिळगांवकर यांचीही प्रमुख भूमिका आहे. अभिनेत्री हेमल इंगळे हि या सिनेमात सचिन पिळगांवकर यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे. असं असताना मुलीच्या भूमिकेसाठी स्वत: च्याच मुलीला म्हणजेच श्रियाला का नाही घेतलं असा सवाल त्यांना माझा कट्टावर विचारण्यात आला. त्यावर सचिन पिळगांवकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मला स्वप्नीलला या सिनेमात घ्यायचं होतं - सचिन पिळगांवकर
सचिन पिळगांवकरांनी म्हटलं की, मला या सिनेमात स्वप्नील जोशीला घ्यायचं होतं. तो या सिनेमात माझ्या जावयाची भूमिका करतोय. तोही मला माझ्या मुलासारखाच आहे. त्यामुळे श्रिया आणि त्याचं नातं हे बहिण भावासारखं आहे. म्हणून ते एकमेकांच्या अपोझिट भूमिकेत काम नाही करु शकत. त्यामुळे मी श्रियाला घेतलं नाही. तसंच जेव्हा या सिनेमाचं काम सुरु झालं, त्यावेळी तिच्याकडे खूप काम होतं, तिला वेळच नव्हता. म्हणून श्रियाला या सिनेमात घेतलं नाही.
श्रियाची आई की सचिनची बायको?
'माझा कट्टा'वर तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारलेली जास्त आवडते, श्रियाची आई की सचिनची बायको? यावर उत्तर देताना सुप्रिया पिळगांवकरांनी म्हटलं की, मला माझ्या लग्नानंतर कुणीही सुप्रिया पिळगांवकर असं म्हटलेलं नाही मला सगळेच सचिनची बायको म्हणूनच ओळखतात आणि ही ओळख मला फार आवडते. त्यानंतर आता लोकं मला श्रियाची आई म्हणून बऱ्याच ठिकाणी ओळख देतात आणि ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे माझ्यासाठी या दोन्हीही ओळख महत्त्वाच्या आहेत.
ही बातमी वाचा :
Prasad Oak : 'कुणीही दिलेलं किंवा शासकीय कोट्यातलं ते घर नाही...,' प्रसाद ओकने स्पष्टच सांगितलं