एक्स्प्लोर

Shreyas Talpade : संपले जरी श्वास..., झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात श्रेयस आणि दीप्तीला अश्रू अनावर, अमेय वाघने सादर केली भावनिक कविता

Shreyas Talpade : झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात अभिनेता अमेय वाघने श्रेयस तळपदेसाठी एक भावनिक कविता शेअर केलीये.

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामधून सावरत श्रेयसने महेश मांजरेकरांच्या (Mahesh Manjarekar) ही अनोखी गाठ या चित्रपटातून कमबॅक केलंय. श्रेयसच्या या कठिण काळात त्याची पत्नी दीप्ती (Dipti Talpade) ही त्याच्यासोबत पावलोपावली होती. दरम्यान त्याच्या आयुष्यातील ह्यात प्रसंगावर नुकत्याच पार पडलेल्या झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात अभिनेता अमेय वाघने (Amey Wagh) कविता सादर केली. 

अमेय वाघ ही कविता सादर करताना उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. तसेच ही कविता ऐकून श्रेयसही भावूक झाला. त्याच्या शेजारी असलेली त्याची पत्नी दीप्तीच्याही डोळ्यात यावेळी पाणी आलं. दरम्यान अमेयने सादर केलेली ही कविता सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होतेय. तसेच अनेकांनी कमेंट्स करत या कवितेला पसंती दर्शवल्याचंही पाहायला मिळतंय. 

अमेयने सादर केली कविता

अमेयने सादर केलेल्या या कवितेमध्ये म्हटलं की,  “संपले जरी श्वास तरी श्रेयस ते परत घेऊन येईल. श्वास जरी संपले तरी हात होता हाती… कारण, देवासोबत भांडत तिथे त्याची बायको उभी होती. देव म्हणाला जा परत…हिरो म्हणाला काय? आईच्या मनात मायेची, रसिकांच्या मनात प्रेमाची, मुलीच्या मनात ओढीची आणि बायकोच्या मनात साथीची अजून धडधड चालू आहे. म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे….. म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे.”

श्रेयसच्या आयुष्यातला तो कठीण काळ

डिसेंबर 14 रोजी श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) वेलकम 2 या चित्रपटाचं शूटींग सुरु असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्या क्षणापासून माझं सारं आयुष्य बदललं असं म्हणत श्रेयसने त्याच्या या अनुभवाविषयी माझा कट्ट्यावरही भाष्य केलं. श्रेयसचा हा झटका इतका गंभीर होता की काही मिनिटांसाठी त्याचा श्वास थांबला होता. त्याचं हृदय बंद पडलं होतं. पण झुकेगा नही म्हणत श्रेयस त्या जीवघेण्या संकटातून, मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलाय. वैद्यकीय भाषेत सांगायचं झालं तर तो क्लिनिकली डेड होता. या सगळ्यात दिप्तीने, श्रेयसच्या बायकोने त्याला प्रचंड खंबीर साथ दिलीये आणि श्रेयसही म्हणतो की त्याला मिळालेला नवा जन्म दिप्तीमुळेच आहे. 

ही बातमी वाचा : 

Majha Katta : तो संपूर्ण दिवस,ती 15 मिनिटं,अन् त्यानंतर बदलेलं आयुष्य, पहिल्यांदाच आयुष्यतल्या सर्वात कठीण काळाविषयी श्रेयस 'माझा कट्ट्या'वर झाला व्यक्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget