एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Majha Katta : तो संपूर्ण दिवस,ती 15 मिनिटं,अन् त्यानंतर बदलेलं आयुष्य, पहिल्यांदाच आयुष्यतल्या सर्वात कठीण काळाविषयी श्रेयस 'माझा कट्ट्या'वर झाला व्यक्त

Majha Katta : फिटनेस फ्रीक्र असणाऱ्या, व्यसनापासून दूर राहणाऱ्या, नेहमीच चार्मिंग आणि उत्साही असणाऱ्या श्रेयसला हृदयविकाराचा झटका यावा ही गोष्ट अनेकांसाठी शॉकिंग होती. पण आता तो पूर्ण बरा आहे.

मुंबई : डिसेंबर 14 रोजी श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) वेलकम 2 या चित्रपटाचं शूटींग सुरु असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्या क्षणापासून माझं सारं आयुष्य बदललं असं म्हणत श्रेयसने त्याच्या या अनुभवाविषयी माझा कट्ट्यावर (Majha Katta) भाष्य केलं. श्रेयसचा हा झटका इतका गंभीर होता की काही मिनिटांसाठी त्याचा श्वास थांबला होता. त्याचं हृदय बंद पडलं होतं. पण झुकेगा नही म्हणत श्रेयस त्या जीवघेण्या संकटातून, मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलाय. त्याच्या या सगळ्या अनुभवांविषयी श्रेयसने माझा कट्ट्यावर संवाद साधला. 

श्रेयसने त्या दिवशी नेमकं काय झालं याविषयी सांगताना म्हटलं की,  मी 14 डिसेंबर रोजी वेलकम 2 चं शूटींग संपवंल. पण याची सुरुवात झाली होती 2022 ऑक्टोबरमपासून. कारण मी तेव्हा शूट केल्यानंतर मला घशामध्ये त्रास होऊ लागला होता. पण त्यावेळी असं वाटलं की कदाचित सीनमध्ये मी खूप मोठ्याने बोललो आहे, त्यामुळे होत असेल. पण तेव्हा मला माझ्या तब्येतीमध्ये काहीतरी जाणवलं. 14 डिसेंबरला वेलकम 2 चं शूट झालं. शूट झाल्यानंतर मी व्हॅनमध्ये गेलो. त्या दिवशी फार अस्वस्थ वाटत होतं. माझ्या मेकअपमॅनने पण विचारलं की सर काही होतंय का. मी त्याला म्हटलं की काही नाही, गाडी रेडी आहे, घरी जाऊ लगेच. मी व्हॅनमध्ये शूज घालण्यासाठी खाली वाकलो. पण मला ते शूज देखील घालता येत नव्हते. मी चप्पल घातली आणि घरी निघालो. 

घरी गेल्यावर जास्त त्रास होऊ लागला

मी घरी पोहचल्यावर मी दीप्तीला सांगितलं असा त्रास होतोय. दीप्तीने आमच्या डॉक्टरांना विचारलं. माझ्या घरी कामाला असणाऱ्या मावशींनी माझा हात चोळला. तेवढ्यापुरतं मला बरं वाटलं पण पुन्हा त्रास होऊ लागला. त्यानंतर मला श्वास घेताना डावीकडे दुखत होतं. त्यामुळे दीप्तीने हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतरही मी तिला काही म्हटलं नाही. आम्ही निघालो. नेहमीप्रमाणे मुंबईच्या रस्त्यावर ट्रॅफीक होतं.  आम्ही हॉस्पिटलपासून अवघ्या काही मिनिटांवर होतं, त्यावेळी मात्र मी पूर्ण कोसळलं. म्हणजे तिथून पुढचं मला काहीच आठवत नाही. त्यानंतर दीप्तीने मला हॉस्पिटलमध्ये कसं नेलं, काय केलं हे मला नंतर लोकांकडून कळालं, असं श्रेयसने सांगितलं.  


माझी जेव्हा एनजीओप्लास्टी सुरु होती. कॅथलॅबमध्ये घेऊन गेले. त्यावेळी तिथे मला त्यांनी म्हटलं की, इथे दिसतंय का तुम्हाला तुमची एनजीओप्लास्टी सुरु आहे. मी म्हटलं अच्छा ओके. त्यानंतर कोणीतरी म्हणालं की सर गाणं लावू का गाणं? त्यानंतर उठलो तेव्हा ते निले निले अंबरपर गाणं लागलं होतं. त्यात कोणीतरी म्हणालं की आरती वैगरे लावा, असं मला अंधुक अंधुक सुरु होतं. पण जेव्हा माझी एनजीओप्लास्टी झाली त्यानंतर डॉक्टर जेव्हा बोलायला आले, तेव्हापासून आठवतंय. माझ्या दोन आट्ररी बंद पडल्या होत्या. एक 100 टक्के आणि दुसरी 95 टक्के. त्यामुळे एनजीग्राफी केल्यानंतर एनजीओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. 

'मला माझ्या शरीराने वेळ दिला'

दीप्तीची एक मानलेली बहीण आहे, ती मला भेटायला आली. त्यावेळी तिने मला म्हटलं की, तुला माहितीये, तू काय केलं आहेस ते. माझा मुलगा मला म्हणाला की, आई श्रेयस दादा तर काहीच नाही करत, त्याला व्यसन नाही, तो तेलकट तूपकट खात नाही, मग तरीही त्याला असं होऊ शकतं, तर आम्ही आता सगळं करणार. काही करुन काही होत नाही, मग का सगळं पाळालयचं. पण एक होतं, मी हे सगळं करत होतो, त्यामुळे माझ्या शरीराने मला वेळ दिला. मला त्रास झाल्यापासून ते हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत मी जवळपास दीड ते दोन तासांचा काळ माझ्या शरीराने मला दिला. त्यामुळे मला पटकन काही झालं नाही, हा एक गमतीशीर पण तितकाच महत्त्वपूर्ण अनुभव श्रेयसने सांगतला. 

 

त्यानंतर संपूर्ण आयुष्यचं बदललं - श्रेयस तळपदे

आपल्या आयुष्यातल्या प्रायोरिटीज ठरलेल्या असतात. आधी माझी प्रायोरिटी माझं काम होती, मग फॅमिली आणि मग हेल्थ पण आता त्यामध्ये पुर्ण बदल झालाय. आधी माझी हेल्थ, माझी फॅमिली आणि मग माझं काम. आधी व्हायचं ही शूट आहे, व्यायाम केला नाही केला शूटनंतर केला. पण आता माझ्या आयुष्यात व्यायामाला जास्त महत्त्व आहे. आधी मी व्यायाम करतो, माझ्या फॅमिलीसोबत वेळ घालवतो मग माझ्या कामाला जातो. त्यामुळे आता व्यायाम आणि फॅमिली ही माझ्यासाठी जास्त महत्त्वाची झाली असल्याचं श्रेयसने यावेळी सांगितलं. 

त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो

ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. ज्यांनी त्या दिवशी दीप्तीची खंबीर साथ दिली आणि अर्थातच देवाचेही आभार ज्याने मला हे दुसरं आयुष्य दिलं. यावर बोलताना श्रेयसची बायको दीप्तीने म्हटलं की, जेव्हा ही बातमी बाहेर आली तेव्हा श्रेयसचा दिग्दर्शक अहमद खान आणि त्यांची पत्नी रात्री अकरा वाजता तिथे आले. मला अक्षयकुमारचे सातत्याने फोन येत होते. त्यांनी मला सांगितलं की दीप्ती तु सांगशील तिथे आपण श्रेयसला नेऊ, तू फक्त सांग. मी जेव्हा त्याला घेऊन जात होते, त्यावेळी देखील अनेकांना जेव्हा माहितीही नव्हतं की श्रेयस तळपदे आहे, तेव्हाही मदत केली. हॉस्पिटलमधला स्टाफ ज्यांची शिफ्ट संपली होती, त्यांनी देखील पुन्हा युनिफॉर्म घालून श्रेयससाठी काम केलं, त्या सगळ्यांचे आभार यावेळी श्रेयस आणि दीप्तीने माझा कट्ट्यावर मानले. 

लवकरच 'या' चित्रपटाच्या माध्यमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

फिटनेस फ्रीक्र असणाऱ्या, व्यसनापासून दूर राहणाऱ्या, नेहमीच चार्मिंग आणि उत्साही असणाऱ्या श्रेयसला हृदयविकाराचा झटका यावा ही गोष्ट अनेकांसाठी शॉकिंग होती. पण आता तो पूर्ण बरा आहे. शो मस्ट गो ऑन म्हणत तो कामाला सुरुवात करतोय. महेश मांजरेकर दिग्दर्शित त्याचा नवा सिनेमा 'ही अनोखी गाठ' लवकरच प्रदर्शित होतोय. 1 मार्च रोजी श्रेयसचा ही अनोखी गाठ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

ही बातमी वाचा : 

Majha Katta : जिथे त्याच्यासाठी सगळं थांबलं होतं, तिथून माझी खरी परीक्षा सुरु झाली, 'माझा कट्ट्या'वर 'त्या' कठीण काळाविषयीचा दीप्ती तळपदेने सांगितला अनुभव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 डिसेंबर 2024  : ABP MajhaSanjay Shirsat on Eknath shinde :  गृहखातं आम्हालाच पाहिजे , बैठकीत मुद्दा मांडणार - शिरसाटGulabrao Patil on Eknath Shinde : शिंदे नाराज नाहीत; कधी न मिळालेलं यश त्यांनी खेचून आणलंयRaosaheb Danve on CM Maharashtra :  मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेला ठावूक आहे - रावसाहेब दानवे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
Embed widget