Shiv Thakare House Caught Fire: आग लागली तेव्हा घरातच होता बिग बॉस फेम शिव ठाकरे; म्हणाला, 'बेडरुमपर्यंत आग गेली असती तर...'
Shiv Thakare House Caught Fire: शिव ठाकरेच्या घराला लागलेल्या भीषण आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण यामध्ये घराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.

Shiv Thakare House Caught Fire: बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) विजेता शिव ठाकरेच्या (Shiv Thakare) मुंबईतील (Mumbai News) राहत्या घराला नुकतीच आग (House Caught Fire) लागलेली. आग फारच भीषण होती, या आगीत शिवचं घर अक्षरशः भस्मसात झालं. धक्कादायक बाब म्हणजे, आग लागली त्यावेळी शिव ठाकरे घरातच होता, पण तो लगेच बाहेर पडला आणि सुदैवानं कोणालाही दुखापत किंवा इजा झालेली नाही. मात्र, भीषण आगीत शिव ठाकरेच्या घराचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. शिव ठाकरेच्या घरातील लिविंग रुमला मोठी आग लागली आणि पाहता पाहता ती मोठ्या प्रमाणावर पसरली. या दुर्घटनेमुळे शिव ठाकरे अजूनही धक्क्यात आहे.
शिव ठाकरेनं हिंदुस्तान टाईम्सला नेमकी आग कशी लागली आणि कशामुळे लागली, हे सांगितलंय. शिव ठाकरे म्हणाला की, "10 सेकंद मला काहीच कळत नव्हतं की, काय झालंय... मग मी माझ्या मित्राला फोन लावला आणि लगेचच फायर ब्रिगेडला बोलावलं. अग्निशामन दलही 5 मिनिटांत पोहोचलं. ही सोसायटी चांगली आहे. पण, आग लागल्यावर ना सायरन वाजला, ना कुठून पाणी आलं. हा टेक्निकल इश्यू आहे. नशीब आग हॉलमध्येच लागली. जर ती बेडरुमपर्यंत पोहोचली असती तर मला बाहेरच पडता आलं नसतं... माझी आज्जी जास्त करुन हॉलमध्ये असायची, पण बाप्पाची कृपा ती सध्या गावी गेलीय..."
View this post on Instagram
"जर संपूर्ण इमारतीला आग लागली असती तर..."
शिवनं सांगितलं की, तो गेल्या काही काळापासून त्याच्या बिल्डिंग मॅनेजमेंटकडे वीज समस्येबद्दल तक्रार करतोय, पण कोणतीही कारवाई झाली नाही. याबाबत बोलताना तो म्हणाला की, "कारवाई विसरून जा, बिल्डिंग मॅनेजमेंट बिल्डरला दोष देतेय आणि बिल्डरनं हार मानलीय. या घटनेनंतर, इमारतीतील सर्व वृद्ध लोक आले आणि म्हणाले की, सर्वजण बऱ्याच काळापासून तक्रार करत आहेत, एखाद्याच्या मृत्यूनंतरच ते ऐकतील का? सध्या ते माझ्या फ्लॅटपुरतं मर्यादित होतं, पण जर संपूर्ण इमारतीला आग लागली असती तर, काय झालं असतं?" तो म्हणाला की, आगीचा अलार्म फक्त आगीची तीव्रता थोडी तीव्र असतानाच वाजतो, म्हणून मी त्याला विचारलं की ती किती तीव्र आहे? प्रत्येकजण एकमेकांना दोष देतोय...
"मॅनेजमेंटने काहीही केलं नाही. मॅनेजमेंट बिल्डरचं नाव घेतात आणि बिल्डरने हात वर केले आहेत. बिल्डिंगमधली वयस्कर लोक ही घटना घडल्यानंतर मला भेटून सांगतायत की, याबद्दल कधीपासून तक्रार करत आहोत. आता कोणाचा जीव गेल्यावरच लक्ष देणार का? नशीब आग माझ्या फ्लॅटमध्ये लागली. पण, जर पूर्ण बिल्डिंगमध्ये लागली असती तर काय केलं असतं?", असा प्रश्नही शिव ठाकरेनं उपस्थित केला आहे.
आग लागल्यामुळे शिवला ताबडतोब नवं ठिकाण शोधावं लागलं. "मी रात्रीसाठी एका मित्राच्या घरी राहिलो. मी काही घरं शॉर्टलिस्ट केली आहेत आणि त्यांना तातडीनं मला घ्यावं लागणार आहे. माझं कुटुंब काळजीत आहे आणि माझी बहीण इथे आहे...", असं त्यानं सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























