एक्स्प्लोर
Advertisement
शिल्पा शेट्टीची माध्यमांविरोधात हायकोर्टात धाव, चुकीच्या बातम्यांमुळे झालेल्या मानहानीबद्दल 25 कोटींची मागणी
राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक माध्यमं कोणतीही खातरजमा न करता माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबियांबाबत वाट्टेल त्या बातम्या प्रसिद्ध करीत आहेत.
पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं मीडियावर आगपाखड करण्यास सुरूवात केली आहे. आपल्याविरोधात बदनामीकारक, आणि तथ्यहिन व्रृत्ते सोशल मीडिया आणि प्रसिद्धी माध्यमांवर छापण्यात येणा-या वृत्तांवर अंकुश लावण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मीडिया आणि सोशल मीडियावर दररोज यासंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या आधारहिन आणि बदनामीकारक बातम्यांना मनाई करण्याची मागणी करणारा एक अर्ज शिल्पाच्यावतीनं न्यायालयात सादर केला गेला आहे. यामध्ये फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसह काही वेब चॅनल आणि वर्तमानपत्रांनाही प्रतिवादी केलं गेलं आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक माध्यमं कोणतीही खातरजमा न करता माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबियांबाबत वाट्टेल त्या बातम्या प्रसिद्ध करीत आहेत. यामध्ये माझी प्रतिष्ठा आणि चारित्र्यहनन होत असून माझ्या व्यावसायिक, कौटुंबिक आणि सामाजिक सन्मानाचा भंग केला जात आहे, असा आरोप या याचिकेतून केला गेला आहे.
त्यामुळे या मानहानी करणाऱ्या वृत्तांकनावर अंकुश लावावा, असे कंटेंट देणा-या माध्यमांकडून 25 कोटींची नुकसान भरपाई वसूल करावी, अशी मागणीही तिनं केली आहे. काही विशिष्ट वेबचॅनल आणि वर्तमानपत्रांचा उल्लेख तिने या अर्जात केला आहे. तसेच अश्या वृत्तांमुळे याप्रकरणी सुरू असलेल्या तपासात देखील बाधा येऊ शकते असंही या अर्जात म्हटलेलं आहे. या प्रकरणाचा माझ्याशी संबंध जोडल्याच्या आधारहिन वृत्तांमुळे आपलं व्यावसायिक नुकसान झाल्यानं आपली प्रतिमाही डागाळली जात आहे. त्यामुळे राज्य घटनेच्या अनुच्छेद 21 नुसार आपल्या मूलभूत अधिकारांवर आक्रमण केलं जात आहे. त्यामुळे अशा प्रसिद्धी माध्यमांना यावर मजकूर प्रसिद्ध करण्यावर मनाई करावी, अशी मागणी शिल्पा शेट्टीनं केली आहे. यावर शुक्रवारी तातडीची सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement