एक्स्प्लोर

'माझ्या मृत्यूपर्यंत 'काटा लगा गर्ल' म्हणून ओळखलं जावं, जगात एकच 'काटा लगा गर्ल' ती मीच', शेफाली जरीवालाचा जुना VIDEO व्हायरल

Shefali Jariwala old interview video : 'माझ्या मृत्यूपर्यंत 'काटा लगा गर्ल' म्हणून ओळखलं जावं, जगात एकच 'काटा लगा गर्ल' ती मीच', शेफाली जरीवालाचा जुना VIDEO व्हायरल

Shefali Jariwala old interview video :  कांटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 42 व्या वर्षी निधन झालंय. मात्र, तिच्या मृत्यूबाबत अजूनही शंका व्यक्त करण्यात येत आहे. तिचा मृत्यू कशामुळे झालाय, याबाबतचा खुलासा तिच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधूनचं होणार आहे. मात्र, शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर तिची एक मुलाखत (Shefali Jariwala old interview video) तुफान व्हायरल झालीय. त्याबाबत तिने एक महत्त्वाची इच्छा व्यक्त केली आहे. (Shefali Jariwala old interview video)

शेफाली या व्हायरल झालेल्या मुलाखतीत (Shefali Jariwala old interview video) म्हणते की, 'माझ्या मृत्यूपर्यंत 'काटा लगा गर्ल' म्हणून ओळखलं जावं, जगात एकच 'काटा लगा गर्ल' ती मीच', शेफालीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तिच्या मृत्यूनंतर सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Cin-A-Mates | Cinema Insider | Film Reviews (@cin_a_mates1)

खूप कमी लोकांना माहीत आहे की शेफाली जरीवालाने अक्षय कुमारच्या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आणि सुपरस्टार पुनीत राजकुमारच्या ब्लॉकबस्टर चित्रपटातून साउथ इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. शेफालीने ‘कांटा लगा’ या गाण्यामुळे लोकप्रियता मिळवली. त्यानंतर ती ‘नच बलिए’, ‘बूगी वूगी’ आणि ‘बिग बॉस 13’ यांसारख्या शोमध्येही झळकलेली पाहायला मिळाली. 

शेफाली जरीवालाने 2004 साली सलमान खान आणि अक्षय कुमारच्या सुपरहिट चित्रपट ‘मुझसे शादी करोगी’मधून डेब्यू केला होता. या चित्रपटात त्यांची अक्षय कुमार आणि कादर खानसोबत एक छोटीशी भूमिका होती. अक्षय आणि शेफालीने एका गाण्यावर डान्स केला होता.

तसंच, शेफालीने पुनीत राजकुमारच्या कन्नड चित्रपट ‘हुडुगारु’ मधून कन्नड इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शन के. मादेश यांनी केलं होतं. यात पुनीत राजकुमार, श्रीनगर किट्टी, योगेश आणि राधिका पंडित हे प्रमुख भूमिकांमध्ये होते.

‘हुडुगारु’ मध्ये शेफाली ‘पंकजा’ या गाण्यावर पुनीत राजकुमारसोबत डान्स करताना दिसली होती. हे गाणं ममता शर्मा, व्ही. हरिकृष्णा आणि नवीन माधव यांनी गायले होते, आणि योगराज भट यांनी याचे बोल लिहिले होते. पुनीत राजकुमार यांच्या निधनानंतर शेफालीने या गाण्याच्या दोन फोटो शेअर करत दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली होती.

‘हुडुगारु’ हा चित्रपट 2011 साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा तीन जवळच्या मित्रांच्या आजूबाजूला फिरते, जे नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. तिघांचे वेगवेगळे स्वप्न असतात, पण एका मुलीच्या प्रेमात पडल्यामुळे त्यांचं आयुष्यच बदलून जातं.

शेफाली जरीवाला शेवटची 'शैतानी रस्में' या शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये नकिया हाजी आणि विभव रॉय हे मुख्य भूमिकेत होते. हा शो एक भारतीय रोमँटिक हॉरर फँटेसी सिरीज होता, ज्याचा प्रीमिअर 15 जानेवारी 2024 रोजी स्टार भारत वर झाला होता. शेफालीने मोठ्या स्टार्ससोबत काम केलं, पण चित्रपटांनी मात्र तिचं नशीब बदललं नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

तरुण दिसण्यासाठी गेल्या 5-6 वर्षांपासून ट्रीटमेंट, कोणती औषधं घ्यायची? शेफाली जरीवालाबाबत डॉक्टरांचा मोठा खुलासा

इंजिनिअरिंग करत असतानाच आयटम साँगमुळे रातोरात फेमस, 'कांटा लगा'साठी शेफाली जरीवालाला किती रुपये मिळाले होते?

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget