इंजिनिअरिंग करत असतानाच आयटम साँगमुळे रातोरात फेमस, 'कांटा लगा'साठी शेफाली जरीवालाला किती रुपये मिळाले होते?
Shefali Jariwala death : अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले आहे. शेफाली जरीवाला हिने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं होतं.

Shefali Jariwala death : मॉडेल आणि अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अचानक झालेल्या मृत्यूने सगळ्यांना धक्का बसला आहे. वयाच्या 42 व्या वर्षी कार्डियाक अरेस्टमुळे तिचं निधन झाल्याचं समोर आलंय. शेफाली जरीवाला ‘कांटा गर्ल’ म्हणून प्रसिद्ध होती. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये म्हणजेच शिक्षण सुरु असतानाच शेफालीला आयुष्यातील पहिला ब्रेक मिळाला होता. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. एका डान्सपासून सुरू झालेला तिचा प्रवास बॉलिवूड आणि रिअॅलिटी शोजच्या जगापर्यंत घेऊन गेला होता.
शेफाली जरीवालाने आपल्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की त्या Academicians च्या कुटुंबातून येतात. याचा अर्थ त्यांच्या घरात अभ्यासाचा, शिक्षणाचा खूप माहौल होता. अशा परिस्थितीत ग्लॅमरच्या जगात येणं आणि स्वतःची खास ओळख निर्माण करणं हे अगदी सोपं नव्हतं. शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर प्राथमिक तपासात कार्डियाक अरेस्टचं कारण समोर आलं आहे. संपूर्ण बाबींचं स्पष्ट चित्र अंतिम रिपोर्ट आल्यानंतरच मिळेल. शेफाली जरीवाला किती शिकलेली होती? जाणून घेऊयात..
Shefali Jariwala Education: शिक्षण आणि परफॉर्मिंग आर्ट्स यांच्यात अफलातून समतोल
शेफाली जरीवालाचा जन्म 15 डिसेंबर 1982 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला होता. starsunfolded.com वर प्रसिद्ध झालेल्या प्रोफाइलनुसार, तिने गुजरातमधील जमनाबाई नरसी स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आहे. तिला शिक्षणात जितकी त्यांना आवड होती, तितकंच तिचं मन परफॉर्मिंग आर्ट्स म्हणजेच डान्स आणि गायन यामध्येही लागत असे. ती या दोन्ही गोष्टींमध्ये उत्तम समतोल राखू शकत होती. तिला पहिला ब्रेक कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच मिळाला होता.
Shefali Jariwala Biography: शेफालीने घेतली होती IT ची डिग्री
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेफाली जरीवालाने मुंबईच्या सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून IT म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये BE ची डिग्री घेतली होती. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये त्यांना गुजरातमधील सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून पासआउट म्हटलं गेलं आहे. मात्र गुजरातमधील त्या कॉलेजची स्थापना 2014 मध्ये झाली होती, तर शेफालीने 2002 मध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं होतं. कॉलेजमध्ये शिकत असतानाच शेफालीला ‘कांटा लगा’ या गाण्याची ऑफर मिळाली होती.
Shefali Jariwala Kaanta Laga Fees: रातोरात मिळाली होती प्रसिद्धी
या एकाच गाण्याने शेफाली जरीवालाला स्टार बनवलं होतं. तिच्या वडिलांना वाटत होते की तिने फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रित करावं आणि ‘कांटा लगा’ ची ऑफर मिळाल्यावरही ते खूश नव्हते. तेव्हा शेफाली आणि त्यांच्या आईने वडिलांना समजावून सांगितलं होतं. कांटा लगा गाण्याचं शूटिंग संपल्यावर शेफालीने पुन्हा तिचं शिक्षण सुरू ठेवलं होतं. शेफाली जरीवालाला ‘कांटा लगा’ साठी केवळ 7 हजार रुपये फी मिळाली होती. या गाण्याने त्यांना जेवढी प्रसिद्धी मिळवून दिली, तेवढी प्रसिद्धी त्यांना बॉलिवूड चित्रपटांनी किंवा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ने मिळवून दिली नव्हती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























