एक्स्प्लोर

Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

Box Office Collection: एखाद्या चित्रपटाच्या कमाईचा आकडा पाहताना तो Gross आहे की Net आणि त्यातून निर्मात्याला प्रत्यक्ष किती हिस्सा मिळतो, हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.

Box Office Collection: एखादा चित्रपट रिलीज झाला की सर्वात आधी चर्चा सुरू होते ती त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची. पहिल्या दिवशी किती कमाई केली, वीकेंडला किती गल्ला केला, चित्रपट हिट ठरला की फ्लॉप, याचे आकडे दररोज समोर येतात. पण हे आकडे नेमके येतात कुठून? चित्रपटाने केलेली कमाई मोजतो कोण? आणि ग्रॉस कलेक्शन, नेट कलेक्शन  आणि डिस्ट्रिब्यूटरचा शेअर यात नेमका फरक काय? चला, सोप्या भाषेत समजून घेऊया.

चित्रपटाच्या कलेक्शनचा हिशोब कुठून सुरू होतो?

चित्रपटाची कमाई मोजण्याची प्रक्रिया थेट थिएटरपासून सुरू होते. देशभरातील सिंगल स्क्रीन थिएटर्स आणि मल्टिप्लेक्स चेनमध्ये किती तिकिटं विकली गेली आणि त्यातून किती पैसे जमा झाले, याची नोंद केली जाते.उदाहरणार्थ, PVR किंवा INOXसारख्या मल्टिप्लेक्समध्ये प्रत्येक शोमध्ये किती तिकिटं विकली गेली, तिकिटाची किंमत किती होती आणि त्या दिवसाचा एकूण महसूल किती झाला, याची माहिती उपलब्ध असते.हीच माहिती पुढे संबंधित डिस्ट्रिब्युटर्सना दिली जाते.

डिस्ट्रिब्युटर्सकडून जमा होतो देशभरातील डेटा

एखादा चित्रपट फक्त एका शहरात किंवा एका राज्यात रिलीज होत नाही. तो वेगवेगळ्या रीजनल सर्किट्समध्ये प्रदर्शित होतो. त्यामुळे त्या-त्या भागातील थिएटर नेटवर्ककडून दररोजच्या कमाईची माहिती गोळा केली जाते. डिस्ट्रिब्युटर्सकडे मुंबई, दिल्ली-यूपी, पंजाब, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा विविध सर्किट्समधील कलेक्शनची माहिती जमा होते. यानंतर हा डेटा ट्रेड ॲनालिस्ट, स्टुडिओ आणि संबंधित इंडस्ट्रीतील संस्था एकत्रित करतात.

मग ट्रेड ॲनालिस्ट काय करतात?

इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट येते. प्रत्येक थिएटरमधील आकडे नेहमीच तितक्या वेगाने किंवा पूर्णपणे उपलब्ध होतीलच असं नाही. विशेषतः काही सिंगल स्क्रीन थिएटर्समधील डेटा उशिरा मिळू शकतो.अशावेळी उपलब्ध आकडे, थिएटरची क्षमता, शोची संख्या आणि तिकिटांची विक्री यासारख्या माहितीच्या आधारे उर्वरित कलेक्शनचा अंदाज लावला जातो. यानंतर देशभरातील वेगवेगळ्या सर्किट्समधील आकडे एकत्र करून चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा अंतिम आकडा समोर आणला जातो.

ग्रॉस आणि नेट कलेक्शनमध्ये काय फरक?

बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये ग्रॉस कलेक्शन आणि नेट कलेक्शन हे दोन शब्द वारंवार ऐकायला मिळतात.ग्रॉस कलेक्शन म्हणजे तिकिटांच्या विक्रीतून थिएटरमध्ये जमा झालेली एकूण रक्कम. यात लागू असलेले सरकारी कर समाविष्ट असतात.तर नेट कलेक्शन म्हणजे ग्रॉस कलेक्शनमधून संबंधित सरकारी कर वजा केल्यानंतर उरलेली रक्कम. त्यामुळे निर्माते आणि ट्रेडमध्ये चित्रपटाच्या कामगिरीचे विश्लेषण करताना नेट कलेक्शन महत्त्वाचे ठरते.

मग निर्मात्याच्या हातात किती पैसे जातात?

इथे येतो डिस्ट्रिक्यूटर शेअर. चित्रपटाच्या Net Collectionमधील संपूर्ण रक्कम निर्मात्याला मिळत नाही. थिएटर मालक आणि मल्टिप्लेक्स चेनसोबत झालेल्या करारानुसार कमाईतील ठराविक हिस्सा त्यांच्याकडे जातो. उरलेल्या रकमेतून निर्माते किंवा स्टुडिओला मिळणाऱ्या वाट्याला डिस्ट्रिक्यूटर शेअर म्हटलं जातं. म्हणजेच, एखाद्या चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली, असं ऐकलं तर याचा अर्थ निर्मात्याच्या खात्यात थेट 100 कोटी रुपये जमा झाले, असा अजिबात होत नाही. तिकिटांची विक्री - थिएटरचा डेटा - डिस्ट्रिब्युटर्स - ट्रेड ॲनालिस्ट - ग्रॉस कलेक्शन आणि नेट कलेक्शन - डिस्ट्रिक्यूटर शेअर अशा टप्प्यांमधून चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईचा हिशोब तयार होतो. म्हणूनच एखाद्या चित्रपटाच्या कमाईचा आकडा पाहताना तो Gross आहे की Net आणि त्यातून निर्मात्याला प्रत्यक्ष किती हिस्सा मिळतो, हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Ram Kadam On Tukaram Mundhe FDA Action On Pan Masala Ad: 'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Embed widget