एक्स्प्लोर

Emraan Hashmi Awarapan 2: इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर

Emraan Hashmi Awarapan 2: 'आवारापन 2' या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ वाढत चालली आहे.

Awarapan 2 Box Office Collection: इम्रान हाश्मीचा (Emraan Hashmi) 'आवारापन 2' (Awarapan 2) या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ वाढत चालली आहे.  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. या सिनेमाची प्रदर्शनापूर्वीच (Entertainment) बरीच चर्चा रंगली होती.  प्रदर्शनानंतर या सिनेमाने धमाकेदार कामगिरी केली. इतकंच नाही,  'आवारापन 2' या सिनेमाने  रोमाँटिक अॅक्शन सिक्वेल सनी देओल यांचा सिनेमा 'बंटवारा 1947' या सिनेमालाही बॉक्स ऑफिस कमाईच्या (Box Office Collection) बाबतीत पछाडलं.  ओपनिंग डे पासून हा सिनेमा धुवांधार कमाई करत आहे.   विकेंडमध्ये या सिनेमाने उत्तम कामगिरी केली आहे.  रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी या सिनेमाने किती कोटींचं केलं? जाणून घेऊयात.

'आवारापन 2' या सिनेमाने तिसऱ्या दिवशी किती कोटींचं कलेक्शन केलं? (Emraan Hashmi Awarapan 2 Box Office Collection)

2007 साली रिलीज झालेला 'आवारापन' या सिनेमाने तरुणाईंना अक्षरश: वेड लावलं होतं.  हा कल्ट क्लासिक सिनेमा आजही प्रेक्षकवर्ग आवर्जून पाहतात.   तेव्हा या सिनेमाला चित्रपटगृहात फारसं यश मिळालं नाही. पण  2026 साली रिलीज झालेला  'आवारापन' या सिनेमाचा सिक्वेल 'आवारापन 2' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. इम्रान हाश्मीने 'शिव पंडित' ही व्यक्तीरेखा साकारुन पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. धमाकेदार ओपनिंग केल्यानंतर विकेंडलाही या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.  

धमाकेदार सुरुवात केल्यानंतर तीस कोटींचं बजेटही या सिनेमाने वसूल केलं आहे.  रविवारी या सिनेमाने चांगली कामगिरी केली. 'आवारापन 2' या सिनेमाने  22 कोटींची कमाई करुन धमाकेदार ओपनिंग केली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत जबरदस्त वाढ झाली असल्याचं पाहायला मिळालं.   दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 33.75 कोटी कमावले. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,   'आवारापन 2'  या सिनेमाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 26.5 कोटींचं  कलेक्शन केलं आहे.

भारतात या सिनेमाने एकूण 82 कोटींचं नेट कलेक्शन केलं. दुसऱ्या दिवशीच्या तुलनेत तिसऱ्या दिवसाच्या कमाईत घट झाली आहे. दरम्यान, हा सिनेमा लवकरच 100 कोटींचं कलेक्शन करेल, यात शंका नाही.  'आवारापन 2' या सिनेमात इम्रान हाश्मीचा तोच 'शिव पंडित' अंदाज पाहायला मिळत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन नितिन कक्कर यांनी केले असून,  या चित्रपटात दिशा पटानी, शबाना आझमी आणि पूरन गब्बी यांच्या महत्त्वाच्या भूमिक आहेत.   हा सिनेमा 14 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात रिलीज झाला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Emraan Hashmi Awarapan 2: इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
CM Yogi Adityanath On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget