एक्स्प्लोर

Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी

Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: आपल्या देशाचं राष्ट्रगीत असलेल्या 'जन गण मन' ऐवजी, 'वंदे मातरम्'चा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला जावा, अशी मागणी अभिनेते मुकेश खन्ना यांनी केली आहे.

Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'शक्तिमान' (Shaktimaan) फेम अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) गेल्या काही दिवसांपासून आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे भलतेच चर्चेत आहेत. मुकेश खन्ना (Mukesh Khanna Controversial Statement) यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अशातच आधीच्याच वक्तव्यांमुळे चर्चेत असतानाच आता त्यांनी आणखी एक धक्कादायक वक्तव्य केलंय. सध्या आपल्या देशाचं राष्ट्रगीत असलेल्या 'जन गण मन' (Jana Gana Mana) ऐवजी, 'वंदे मातरम्'चा (Vande Mataram) राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला जावा, अशी मागणी अभिनेते मुकेश खन्ना यांनी केली आहे. 'जन गण मन' हे आपलं नसल्यामुळे ते लवकरात लवकर रद्द केलं जावं, असा ठाम दावाही त्यांनी यावेळी बोलताना केलाय.

'आयएएनएस' (IANS) ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुकेश खन्ना यांनी असा दावा केलाय की, 'जन गण मन' हे राणी एलिझाबेथ यांच्या सन्मानार्थ लिहिलं गेलंय आणि ते भारताचं खरं राष्ट्रगीत नाही... त्याऐवजी तो दर्जा 'वंदे मातरम्'ला मिळायला हवा, जे लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी गायलेलं प्रसिद्ध गीत आहे. खन्ना यांनी हे देखील सांगितलंय की, त्यांनी दोन वर्षांपूर्वी 'वंदे मातरम्'चं एक व्हर्जन रेकॉर्ड केलं होतं आणि ते लवकरच प्रदर्शित करण्याची त्यांची योजना आहे.

मुकेश खन्ना 'जन गण मन'बाबत नेमकं काय म्हणाले? (Mukesh Khanna On Jana Gana Mana)

अभिनेते मुकेश खन्ना म्हणाले की, "तीन वर्षांपूर्वी मी म्हटलेलं की 'वंदे मातरम' हेच राष्ट्रगीत असायला हवं... 'जन गण मन' हे आपलं नाही, रवींद्रनाथ टागोर यांनी राणी एलिझाबेथच्या राजवटीत त्यांच्या सन्मानार्थ ते स्तुतिगीत लिहिलेलं आणि आपण ते केवळ स्वीकारलंय... 'भाग्यविधाता पंजाब सिंध' यांसारखे शब्दप्रयोग, ते काही आपले नाहीत... लताजींनी गायलेलं 'वंदे मातरम्' हेच खऱ्या अर्थानं आपलं आहे..."

मुकेश खन्ना यांनी स्वतःही केलंय 'वंदे मातरम्'चं रेकॉर्डिंग (Mukesh Khanna On Vande Mataram)

'वंदे मातरम्'ला महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी आणि त्याला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मुकेश खन्ना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली. ते म्हणाले की, "मी कल्याणजी-आनंदजी जोडीसोबत हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी पुढाकार घेतला, हे गाणं गेल्या दोन वर्षांपासून माझ्याकडे आहे... मी 'वंदे मातरम्'चं सात मिनिटांचं एक असं व्हर्जन रेकॉर्ड केलंय, जे निश्चितच अजरामर ठरेल... माझी अशी इच्छा आहे की, 'जन गण मन' हटवून त्याच्या जागी लवकरात लवकर 'वंदे मातरम्'चा स्वीकार केला जावा..." 

एका वर्षांत रिलीज करणार स्वतःच्या आवाजातलं 'वंदे मातरम्' (Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana)

मुकेश खन्ना म्हणाले की, "मोदीजींनी या प्रक्रियेला गती दिलीय... आता प्रत्येक शाळेत आणि प्रत्येक कार्यक्रमात 'वंदे मातरम्' गायलं जाईल, आणि तेही केवळ तीन किंवा चार कडवी नव्हे, तर सर्व सातही कडवी... ज्यात पूर्वी आक्षेपांमुळे वगळण्यात आलेल्या कडव्यांचाही समावेश असेल... 'वंदे मातरम्'चं हे पुनरागमन पाहून मला आनंद होतोय... मी स्वतःही या गाण्याचं माझं स्वतःचं एक व्हर्जन तयार करून ते याच वर्षात प्रदर्शित करण्याचा विचार करतोय..."

समय रैनावरची टीका भोवली, मुकेश खन्ना वादाच्या भोवऱ्यात (Mukesh Khanna On Samay Raina)

समय रैनावर टीका केल्यामुळे मुकेश खन्ना अलीकडेच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले. समयची भाषा आणि त्याच्या शोमधील मजकूर यांच्यावर टीका करताना खन्ना यांनी म्हटलं होतं की, त्याचं तोंड काळं करून त्याची गाढवावरून धिंड काढली जावी... समय रैनानं त्याच्या शोमध्ये खन्ना यांना रोस्ट केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलेलं. मात्र, अवघ्या काही महिन्यांनंतरच हे दोघे एका जाहिरातीत एकत्र दिसले, ज्यामुळे लोकांची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली, त्यानंतर अनेकांनी मुकेश खन्ना यांच्यावर कडक शब्दांत टीका केलेली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Miss World 2026 :  डोमिनिकन रिपब्लिकच्या शिरपेचात मानाचा तुरा, जोहेरी मोला डोमिंग्वेझच्या डोक्यावर मिस वर्ल्ड 2026 मुकूट
डोमिनिकन रिपब्लिकच्या शिरपेचात मानाचा तुरा, जोहेरी मोला डोमिंग्वेझच्या डोक्यावर मिस वर्ल्ड 2026 मुकूट
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
Advertisement

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget