(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharmishtha Raut : 'आज मी त्याच स्वामीइच्छेत जगतेय...', अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा स्वामींसोबत भावनिक संवाद
Sharmishtha Raut : अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने थेट स्वामींशी भावनिक संवाद साधला आहे. त्यावेळी तिने स्वामींचे आभारही मानले आहेत.
Sharmishtha Raut : अभिनेत्री आणि निर्माती म्हणून शर्मिष्ठा राऊत (Sharmistha Raut) ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकाविश्वातही तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण नुकतच तिच्या एका फोन कॉलमुळे तिने एकदा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनं जिंकलीत. एका मुलाखतीदरम्यान शर्मिष्ठाने थेट स्वामींशी संवाद साधला. हा संवाद साधताना शर्मिष्ठा भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. शर्मिष्ठाने राजश्री मराठीच्या मुलाखतीमध्ये स्वामींशी संवाद साधला. सध्या तिच्या या फोन कॉलची सोशल मीडियावरही बरीच चर्चा आहे.
शर्मिष्ठाने काय म्हटलं?
शर्मिष्ठाने या फोन कॉलदरम्यान म्हटलं की, 'आतापर्यंत मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे आलीये तेव्हा तेव्हा फक्त मागितलंय आणि तुम्हीही न मागता बरचं काही दिलंत. त्यासाठी मी तुमचे कधी आभार मानलेच नाहीत. अक्कलकोटला तुम्ही बसलेले असता आणि माझ्यासोबतही कायम असता.गाडीवर किंवा टेम्पोच्या मागे बऱ्याचदा जेव्हा भिऊ नको तुझ्या पाठिशी आहेत,असं जेव्हा वाचते तेव्हा बरं वाटतं. गाडीतही जेव्हा बसते तेव्हा बाजूला तुम्हीच बसलेले आहात, असं वाटतं. बरेच जण तुम्हाला घाबरता, लोकांना असं वाटतं की नवस केला आणि तो फेडला नाही तर तुम्ही चिडाल. पण माझ्यावर तुम्ही कधीच नाहीत चिडला.'
'त्याच स्वामीइच्छेत मी आज जगतेय'
पुढे बोलताना शर्मिष्ठाने म्हटलं की, ' मी इतकं कोसलंय तुम्हाला, इतकं वाईटसाईट बोलले आहेत, पण तुम्ही कधीच माझ्याकडे पाठ फिरवली नाही. खरंच स्वामी तुमचे सगळ्याचसाठी खूप आभार. तुमचं एक वाक्य आहे, स्वत:च्या इच्छेपेक्षा स्वामीइच्छेत जगा आणि त्याच स्वामीइच्छेत मी आज जगतेय. जेव्हा जेव्हा मला असं वाटत होतं की सगळं संपलं तेव्हा तेव्हा तुम्ही होतात तिथे. तुम्ही मला सांगितलं की आयुष्यात दुसरी संधी घ्यायला हवी आणि तेजसच्या रुपाने माझ्या आयुष्यात एक खूप छान जोडीदार पाठवला. मी तुम्हाला कधीच घाबरत नाही, पण एकदाच घाबरते जेव्हा जेव्हा मी तुमची शपथ घेते. कारण लहानपणी जेव्हा मी तुमची खोटी शपथ घेतली होती, त्यावेळी मी गुडघ्यावर खूप जोरात पडले होते. तेव्हा मला लक्षात आलं की आपण स्वामींची खोटी शपथ घेतली. तेव्हापासून मी आतापर्यंत तुमची कधीही खोटी शपथ घेतली नाही. मला तुमची साथ मी मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही तुमची साथ हवी आहे. त्यामुळे माझ्या शेवटच्या क्षणीही मी तेवढीच आनंदी असणार आहे, कारण मी तेव्हा तुम्हाला भेटेन.'