MC Stan Social Media Post : 'अल्लाह मौत दे दे बस', MC Stanच्या ब्रेकअपनंतरच्या पोस्टमुळे चाहत्यांना बसला धक्का
MC Stan Social Media Post : ब्रेकअपनंतर एमसी स्टॅनने केलेल्या एका पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तसेच त्याच्या या पोस्टमुळे त्याचे चाहतेही बरेच नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय.
![MC Stan Social Media Post : 'अल्लाह मौत दे दे बस', MC Stanच्या ब्रेकअपनंतरच्या पोस्टमुळे चाहत्यांना बसला धक्का Bigg Boss 16 winner MC Stan cryptic post sparks concerns among netizens writes Ya allah bas maut de Entertainment Latest Update detail marathi news MC Stan Social Media Post : 'अल्लाह मौत दे दे बस', MC Stanच्या ब्रेकअपनंतरच्या पोस्टमुळे चाहत्यांना बसला धक्का](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/24/bbdea65c6de4048572f09684e02edc6e1716568395280720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MC Stan Social Media Post : 'बिग बॉस 16'चा विजेता आणि प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅनच्या (MC Stan) एका पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसलाय. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर जी स्टोरी ठेवली आहे त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय. एमसी स्टॅनने काही दिवसांपूर्वी त्याच्या ब्रेकअपची पोस्ट टाकली होती. त्याने त्याची गर्लफ्रेंड बुबासोबत ब्रेकअप केले. त्यानंतर त्याने टाकलेल्या पोस्टची बरीच चर्चा सुरु आहे.
एमसी स्टॅन आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे एकमेकांवर खूप प्रेम होते, हे बिग बॉसच्या घरातही पाहायला मिळालं होतं. दोघे आता लग्नही करणार होते, पण त्यांचं आता ब्रेकअप झालं आहे. पण एमसी स्टॅनने सोशल मीडियावर अशी पोस्ट का केली हे कोणालाच समजत नाही.
एमसी स्टॅन गर्लफ्रेंडसोबत करणार होता लग्न
'बिग बॉस 16' दरम्यान एमसी स्टॅन अनेकदा त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल बोलताना दिसला होता. पण आता त्यांचे ब्रेकअप झाले आहे. त्यानंतर त्याने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, 'अल्लाह मौत दे दे बस.' त्यामुळे त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
View this post on Instagram
एमसी स्टॅनची नेट वर्थ आणि करिअर
करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, एमसी स्टॅनने अलीकडेच सलमानच्या प्रॉडक्शन चित्रपट 'फरे'मधून गायक म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. याशिवाय तो स्वतःचे म्युझिक व्हिडिओ आणि रॅप्सही बनवतो. रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती 15-20 कोटी रुपये आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)