Sharad Talwalkar Grandson Kapil Talwalkar In Hollywood: हॉलिवूड गाजवतोय दिवंगत मराठी अभिनेत्याचा नातू, वडील प्रसिद्ध क्रिकेटर, नुकताच झळकलाय 'या' प्रसिद्ध वेब सीरिजमध्ये...
Sharad Talwalkar Grandson Kapil Talwalkar In Hollywood: प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा नातू त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या अभिनयानं मराठी किंवा हिंदी नाहीतर चक्क हॉलिवूड गाजवतोय.

Sharad Talwalkar Grandson Kapil Talwalkar In Hollywood: 'मुंबईचा जावई', 'अवघाची संसार', 'धूमधडाका', 'सुधरलेल्या बायका' यांसारख्या असंख्य चित्रपटांमधून 80 च्या दशकात रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारं नाव म्हणजे, शरद तळवलकर (Sharad Talwalkar). एकही संवाद न बोलता आपल्या चेहऱ्यावरील भावांमधून विनोद घडवून आणणाऱ्या काही मोजक्या अभिनेत्यांमध्ये शरद तळवलकरांचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. शरद तळवलकर आज आपल्यात नसले तरीसुद्धा त्यांचे चित्रपट आणि त्यांनी केलेला अभिनय आजही प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. शरद तळवलकरांनी वयाच्या 82व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि मराठी सिनेसृष्टीनं एक लखलखता तारा गमावला. पण, आज त्यांचा नातू त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या अभिनयानं मराठी किंवा हिंदी नाहीतर चक्क हॉलिवूड गाजवतोय.
शरद तळवलकर यांना दोन मुलं, उमेश तळवळकर आणि हेमंत तळवळकर. हेमंत तळवळकर (Hemant Talwalkar) म्हणजे, भारतीय क्रिकेट संघातलं मोठं नाव. 1977 ते 1980 च्या काळात हेमंत तळवळकरांनी क्रिकेटचं मैदान गाजवलं. त्यांनी रणजी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं. पण, त्यानंतर मात्र ते परदेशात जाऊन स्थायिक झाले. तिथेच त्याना एक गोंडस मुलगा झाला. आता त्यांचा हाच मुलगा हॉलिवूड गाजवतोय. आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून शरद तळवलकरांचा नातू आणि हेमंत तळवलकरांचा मुलगा कपिल तळवलकर (Kapil Talwalkar) सध्या हॉलिवूडमध्ये काम करतोय.
कपिलनं लहान असतानाच आजोबांसारखं सिनेसृष्टीत काम करायचं ठरवून टाकलेलं. त्याला आजोबांकडून अभिनयाचे धडे गिरवायचे होते, पण त्याची ती इच्छा अपूर्णच राहिली. आजोबांचं निधन झालं. पण, कपिलनं जिद्द सोडली नाही. अमेरिकेत राहणाऱ्या कपिलनं शाळा, कॉलेजात शिकत असताना तिथल्या नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यानं युनिव्हर्सिटीमधून अभिनय आणि संगीताचं शिक्षण घेतलं. त्यानं आपल्या जिद्दीच्या जोरावर हॉलिवूडमध्ये एक उत्तम संगीतकार, अभिनेता, पटकथाकार, लेखक अशी ओळख बनवली.
कपिलला खरी ओळख आणि प्रसिद्धी मिळाली ती, 'अमेरिकन प्रिन्सेस' या चित्रपटातून. पुढे, 'झोयास एक्स्ट्रा ओर्डीनरी', 'ख्रिसमस चार्म सिरीजच्या 4' सीझनमध्येही तो झळकला. पुढे 'सेशन 19' या सीरीजमध्ये तो मुख्य भूमिकेत दिसला. कपिलनं अभिनेता म्हणून तर ओळख बनवलीच, पण काही चित्रपटांसाठी त्यानं डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























