Mulshi Pattern Actress Malvika Gaekwad: मुळशी पॅटर्नमधली 'चहावाली' ऑक्सफर्डची पदवीधर; राजघराण्याशी कनेक्शन अन् कोट्यवधींच्या बिझनेस ब्रँडची मालकीण, तुम्ही ओळखता का?
Mulshi Pattern Actress Malvika Gaekwad: 'मुळशी पॅटर्न' मध्ये चहावालीची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव आहे, मालविका गायकवाड. अभिनेत्रीनं नुकतंच ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.

Mulshi Pattern Fame Actress Malvika Gaekwad: मराठीतील काही लक्षात राहणाऱ्या सिनेमांची नावं आठवली तर, त्यामध्ये 'मुळशी पॅटर्न'चं (Mulshi Pattern) नाव चटकन लक्षात आल्याशिवाय राहत नाही. सिनेमातील प्रत्येक पात्रानं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलेलं. पुण्यातील धक्कादायक वास्तव मांडणारा 'मुळशी पॅटर्न' रिलीज झाला आणि खळबळ माजली. या सिनेमातील प्रत्येक पात्रानं आपली भूमिका जीवंत करण्यासाठी जीव ओतला होता. असंच एक पात्र म्हणजे, मुळशी पॅटर्नमधली 'चहावाली'. आता तुम्ही म्हणाल, हीचं मध्येच काय? तर, 'मुळशी पॅटर्न'मधली चहावाली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याला कारणंही तसंच आहे.
'मुळशी पॅटर्न' मध्ये चहावालीची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव आहे, मालविका गायकवाड (Malvika Gaekwad). अभिनेत्रीनं नुकतंच ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतून (Oxford University) आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. मुळशी पॅटर्न चित्रपटात मालविकानं चहावालीची भूमिका साकारली होती. तसं पाहायला गेलं तर भूमिका छोटीशीच होती, पण मालविकानं केलेल्या अभिनयामुळे सर्वांच्या लक्षात राहिली. मालविकाचा हा पहिला आणि शेवटचा चित्रपट. त्यानंतर मालविकाचं लग्न झालं आणि पुढच्या शिक्षणासाठी ती इंग्लंडला गेली.
सर्वसामान्य नाही, राजकरण्या आहे मालविका
मालविका गायकवाडनं पुण्याच्या सिंहगड कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. त्याचवेळी तिला 'मुळशी पॅटर्न'च्या ऑडिशनबाबत कळालं आणि तिनं ऑडिशन दिलं. मालविकाची निवड झाली. मालविकानं चहावालीची भूमिका साकारली. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे, तर मालविका गायकवाड सर्वसामान्य मुलगी नाही, तर ती राजकन्या आहे. बडोद्याच्या गायकवाड राजघराण्याची ती राजकन्या आहे. मालविकानं 2020 मध्ये सिद्धार्थ सिंघवीसोबत आपली लग्नगाठ बांधली. मधल्या काळात सेंद्रिय शेतीविषयी जागरुकता वाढावी म्हणून तिनं मित्रमंडळींना सोबत घेऊन 'द ऑरगॅनिक कार्बन' नावानं कंपनी सुरू केली. याशिवाय 'हंपी A2' या नावानं कंपनी सुरू करून दुधाच्या पदार्थांची विक्री केली. सेंद्रिय शेतीविषयक अधिक जाणून घेता यावं म्हणून इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून तिनं नुकताच अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.























