(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shahid Kapoor : पत्नी मीरासोबत असणाऱ्या वयातील अंतरावर शाहिदचं वक्तव्य; म्हणाला...
मुलाखतीमध्ये शाहिदनं मीराच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल सांगितले होते.
Shahid Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरनं (Shahid Kapoor) मीरा राजपूतसोबत (Mira Rajput) 2015 मध्ये लग्नगाठ बांधली. शाहिद आणि मीरा यांच्या सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओला नेटकऱ्यांची नेहमी पसंती मिळते. ही जोडी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. अनेक वेळा मुलाखतींमध्ये शाहिद आणि मीरा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगत असतात. अशाच एका मुलाखतीमध्ये शाहिदनं मीराच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल सांगितले होते.
मुलाखतीमध्ये मीरानं सांगितलं की, मला शाहिदबद्दल सर्व माहित आहे तसेच त्यालाही माझ्याबद्दल माहिती आहे.' याबाबत शाहिद म्हणतो, 'मी आत्ता देखील तुझ्या एक्स बॉयफ्रेंड्सला शोधत आहे.' मुलाखतीमध्ये मीरसोबत असणाऱ्या वयातील अंतराबाबत देखील शाहिदनं सांगितलं. शाहिदनं सांगितलं की, 'मीराला माझ्यापेक्षा 10 वर्ष लहान असणारी आवडतात, या गोष्टीबद्दल मला नेहमी वाईट वाटतं. '
View this post on Instagram
मीरासोबत लग्न करण्याआधी शाहिदचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. करीना कपूर, प्रियांका चोप्रा, विद्या बालन, आमृता राव, सोनाक्षी सिन्हा या अभिनेत्रींसोबत शाहिदचं नाव जोडण्यात आलं होतं. पण नंतर 2015 साली मीरा आणि शाहिदचा विवाहसोहळा पार पडला. त्यांनी मीशा आणि जॅन ही दोन मुलं आहेत.
हेही वाचा :
- Akshyaya - Hardik Engagement : तु्म्ही केलेलं प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही..., अंजलीबाईंनी साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मानले आभार
- Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली ठाण्याची शुद्धी कदम
- Sonu Sood : भोंगा आणि हनुमान चालीसा वादावर सोनू सूदची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाला कोरोनाकाळात...