(Source: ECI/ABP News/ABP Majha)
यंदा एकही पिक्चर केला नाही, तरी किंग खानची हवा, 'या' एका गोष्टीत शाहरुख सलमान, बचन्नजींनाही परला भारी!
Shah Rhukh Khan : बॉलिवूडचा बदशाहा म्हणून ओळख असलेल्या शाहरुख खानने एका बाबतीत सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांना मागे टाकले आहे.
मुंबई : बॉलिवूडचा बादशाहा शाहरुख खान (Shah Rukh Khan) घराबाहेर पडला तरी त्याच्याभोवती हजारो लोक गोळा होता. जगभरात त्याचे कोट्यवधि चाहते आहेत. त्याचा चित्रपट आल्यावर चित्रपटगृहांत अक्षरश: लोकांची झुंबड उडते. त्याच्या जवान या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड्स मोडले. दरम्यान, किंग खानचा यावर्षी एकही चित्रपट आला नाही. मात्र कोणताही चित्रपट आलेला नसूनही या वर्षी शाहरुखचा जलवा कायम आहे. त्याने एका बाबतीत दंबग अभिनेता सलमान खान आणि मेगास्टार अमिताभ बच्चन यांनादेखील मागे टाकलंय.
शाहरुखने टाकलं सलमानला मागे
शाहरुख खान 2024 साली सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला आहे. त्याने भरलेला टॅक्स पाहूनच तु्म्हाला कल्पना येऊ शकते की, त्याचा चित्रपट आलेला नसला तरी कमाईच्या बाबतीत तो सर्वांत पुढे आहे. फॉर्च्यून इंडियाने सप्टेंबर महिन्यात आर्थिक वर्ष 23-24 मध्ये सर्वाधिक कर देणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली होती. या यादीत शाहरुख खान सर्वोच्च स्थानावर आहे.
कोणी किती कर भरला?
याच यादीनुसार शाहरुख खानने 2023-24 मध्ये साधारण 92 कोटी रुपयांचा फक्त कर भरला आहे. शाहरुख खाननंतर तमीळ सुपरस्टार थलापती विजयचे नाव येते. त्याने या वर्षी तब्बल 80 कोटी रुपयांचा कर भरला आहे. तर सलमान खानने 75 कोटी आणि बॉलिवूडचे मेगा स्टार अमिताभ बच्चन यांनी 71 कोटी रुपयांचा कर भरला आहे. सेलिब्रिटी करदात्यांमध्ये क्रिकेटर विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी यांचेदेखील नाव आहे. शाहरुख खानने 66 कोटी रुपयांचा कर भरला आहे. अजय देवगनने 42 कोटी तर महेंद्रसिंह धोनी यांनी 38 कोटी रुपयांचा फक्त कर भरला आहे.
यावर्षी चित्रपट आला नाही, पण...
दरम्यान, जानेवार 2023 मध्ये शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली होती. या चित्रपटाने साधारण 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे कमवले होते. त्यानंतर शाहरुख खानचा जवान हा चित्रपट आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1150 कोटी रुपयांची कमाई केली. शाहरुख खानचा डंकी हा चित्रपट मात्र फारशी कमाई करू शकला नाही. या चित्रपटाने अवघ्या 400 कोटींची कमाई केली. हे तिन्ही चित्रपट मिळून शाहरुखने तब्बल 2500 कोटींचा गल्ला जमवला.
हेही वाचा :
3 सेकंदांची क्लीप अन् तब्बल 10 कोटींचा दावा, नयनतारा-धनुष यांच्यात टोकाचा वाद, नेमकं प्रकरण काय आहे?