Video : हात जोडले अन् CISF जवानाला नमस्कार केला! शाहरुख खानच्या एअरपोर्ट स्वॅगने जिंकली चाहत्यांची मनं
Shah Rukh Khan : या व्हिडीओमध्ये शाहरुख खानचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं.
![Video : हात जोडले अन् CISF जवानाला नमस्कार केला! शाहरुख खानच्या एअरपोर्ट स्वॅगने जिंकली चाहत्यांची मनं Shah Rukh Khan greets CISF personnel at Mumbai airport with folded hands Video : हात जोडले अन् CISF जवानाला नमस्कार केला! शाहरुख खानच्या एअरपोर्ट स्वॅगने जिंकली चाहत्यांची मनं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/05/fc3bcd4e4db31cbb34616bea50a75791_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा ‘किंग खान’ अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता. शाहरुख खान शुक्रवारी रात्री स्पेनला रवाना झाला आहे. या दरम्यान त्याचे विमानतळावर क्लिक केले गेलेले फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. यावेळी शाहरुख खानने मॅचिंग पँटसोबत काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला दिसला. या लूकसोबत त्याने निळ्या रंगाचे जॅकेट घातले होते.
या दरम्यानच्या एका व्हिडीओने किंग खानच्या चाहत्यांचं मन जिंकलं आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं.
शाहरुख खानचा एअरपोर्ट व्हिडीओ चर्चेत!
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरेन शहा यांनी त्यांच्या यूट्यूब अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान विमानतळाच्या प्रवेशद्वाराकडे जाताना दिसत आहे. यादरम्यान, जेव्हा त्याची नजर एका व्यक्तीवर पडते, ज्याला किंग खान चक्क मिठी मारतो. हा माणूस शाहरुखचे स्वागत करतो. यानंतर समोर उभा असलेला सीआयएसएफ अधिकारी तपासणीसाठी हळूहळू पुढे येण्यास सांगतो तेव्हा, शाहरुख खान लगेच त्याच्या सूचनांचे अनुसरण करतो.
सुरक्षा अधिकाऱ्यासमोर हात जोडले!
काही क्षणांनंतर, अधिकारी शाहरुख खानला तिथून पुढे जायला सांगतो, त्यानंतर शाहरुख खान त्याला वाकून हात जोडून नमस्कार करतो आणि पुढे निघून जातो. शाहरुख खान त्याच्या चाहत्यांशी आणि इतरांशी विनम्रपणे वागण्यासाठी ओळखला जातो. शाहरुख खान नुकताच त्याच्या 'पठाण' चित्रपटाच्या निमित्ताने स्पेनला रवाना झाला आहे.
पाहा व्हिडीओ :
नुकतीच निर्मात्यांनी ‘पठाण’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. शाहरुखचा हा आगामी चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किंग खानने नुकतेच ट्विटरवर #AskSRK सेशन देखील केले होते, ज्यामध्ये शाहरुख खानने त्याच्या सर्व चाहत्यांशी गप्पा मारल्या आणि त्यांच्या प्रश्नांना मजेदार उत्तरे दिली.
हेही वाचा :
- Swaranjali Shinde : आधी आदर्श-उत्कर्षचा गाजावाजा, आता शिंदेंची लेक दाखवणार ‘शिंदेशाही बाणा’!
- Jhund : ‘नागराज ऑस्कर आणेल याची खात्री!’, ‘झुंड’ पाहून भारावलेल्या वैभव मांगलेंची पोस्ट
- Jhund : ‘...एकाच फ्रेममध्ये असून मीच माझ्यासाठी इनव्हीजिबल होतो’, अभिनेते किशोर कदम यांची ‘बिग बीं’साठी खास पोस्ट!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)