12 वाजून 56 मिनिटांनी त्याचा मेसेज आला...निधनापूर्वी सतीश शाह यांचा सचिन पिळगांवकरांना आलेला शेवटचा मेसेज
ते पुढे म्हणाले, तुम्हाला खरोखर माहीत नसते की तुमच्या सोबत काय घडणार आहे .तुम्ही काहीही भाकीत करू शकत नाही .

Satish Shah last message to Sachin Pilgaonkar: आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे जेष्ठ अभिनेते सतीश शहा (Satish Shah) यांचे काल (25 ऑक्टोबर) वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. जवळपास चार दशक सतीश शाह यांनी हिंदी चित्रपट सृष्टी आणि टेलिव्हिजन जगतात आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे. चित्रपट ,नाट्य आणि टीव्ही क्षेत्रात आपल्या विनोद बुद्धी टाइमिंग आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेले सतीश शाह यांचा मित्रपरिवार ही मोठा होता . सतीश शाह यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र व ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . निधनापूर्वी सतीश शाह यांचा सचिन पिळगावकर यांना मेसेज आला होता असं एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं .
'आज दुपारी 12 वाजून 56 मिनिटांनी त्याचा मेसेज आला होता .. '
सतीश शाह यांच्या निधनानंतर दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी निधनाच्या बातमीनं मोठा धक्का बसला असल्याचा सांगितलं . ते म्हणाले, " सुप्रिया तीन दिवसांपूर्वी सतीश आणि मधुला भेटून आली होती .सतीश ने कोणतेतरी गाणे ऐकवले होते .त्यावर मधु आणि सुप्रिया नाचल्या होत्या .सतीश आणि मी नेहमी बोलायचो .मेसेज करायचो .त्याचा मला आजच दुपारी 12 वाजून 56 मिनिटांनी त्याचा मेसेज आला होता . त्यावेळी तो पूर्णपणे ठीक होता .पण त्याचा निधनाची अचानक बातमी आली .हे बातमी मुळे मला मोठा धक्का बसला आहे असं सचिन पिळगावकर म्हणाले .
गंमत जंमत मराठी चित्रपटात एकत्र काम
1987 मध्ये आलेल्या गंमत जंमत या मराठी चित्रपटात अभिनेते सचिन पिळगावकर आणि सतीश शाह यांनी एकत्र काम केलं होतं .या चित्रपटादरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली . सतीश शाह यांच्या आयुष्यातील शेवटचे दिवस कसे होते याविषयी सांगताना सचिन पिळगावकर म्हणाले, " गंमत जंमत हा त्यांचा पहिला चित्रपट होता .आम्हाला एकत्र येण्यासाठी एक कारण हवे होते आणि 1987 चा हा चित्रपट ते कारण ठरला .त्यानंतर आम्ही कधीच एकत्र काम केलं नाही पण तिथेच आमची चांगली मैत्री झाली "
सचिन आणि मधून नेहमीच खूप मैत्रीपूर्ण होते .आम्ही त्यांना आमच्या सर्व चित्रपटांच्या प्रीमियर मध्ये कायम आमंत्रित करायचो .ते आमच्या पाहुण्यांच्या यादीत कायम असायचे .त्यांच्याशिवाय कधीच काहीही आम्ही साजरे केले नाही .दुर्दैवाने मधुचि ही तब्येत ठीक नाही . तिला अल्झायमर आहे . यावर्षी सतीश नाही किडनी प्रत्यारोपण करून घेतले होते .जेणेकरून त्याला मधुची काळजी घेता येईल .तो डायलिसिस वर होता .यापूर्वी त्याची बायपास सर्जरीही यशस्वी झाली होती . "
ते पुढे म्हणाले, तुम्हाला खरोखर माहीत नसते की तुमच्या सोबत काय घडणार आहे .तुम्ही काहीही भाकीत करू शकत नाही .आनंदी राहणं आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांना आनंदी ठेवणं हाच हेतू आहे .जो त्याने केला .तुमची वेळ कधी येईल हे तुम्ही नाही सांगू शकत असेही सचिन पिळगावकर म्हणाले .
























