एक्स्प्लोर

Saregamapa Little Champ: मॉनिटर आणि मोदकाचे सूर जुळले! प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायनने दिली प्रेमाची कबुली

सारेगमप लिटील चॅम्प फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे आणि सोशल मीडियावर अनेकांना एकच धक्का बसला आहे.

Saregamapa Little Champ: झी मराठीवरील सारेगमप लिटील चॅम्प या रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावरुन आता दुसऱ्या जोडप्यांचे सूत जुळले आहे. याआधी रोहित आणि जुईली यांनी प्रेम संबंधातून पुढे लग्न देखील केलं आणि आता सारेगमप लिटील चॅम्प फेम प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) याच्या सोशल मीडियावरील पोस्टने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण, प्रथमेशने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर आपल्या प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली आहे. 'आमचं ठरलंय' या कॅप्शनमध्ये त्याने मुग्धा वैशंपायनसोबत (Mugdha Vaishampayan) फोटो पोस्ट केला आहे.

जसे तुम्ही सर्व अपेक्षा करत होते, त्याप्रमाणेच आता आम्ही दोघे कबुली देतो - आमचं ठरलंय! असं प्रथमेश लघाटेने इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे. शिवाय या पोस्टला त्याने #MGotModak #ModakGotMonitor #forever #couplegoals असे हॅशटॅग देखील दिले आहेत. या हॅशटॅगवरून हे दोघे प्रेमात असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

प्रथमेश लघाटेने मॉनिटर, अर्थात मुग्धा वैशंपायन हिच्यासोबत सूर जुळल्याची कबुली फेसबूक पोस्ट करत देखील दिली आहे, दोघे एकत्र असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. प्रथमेशची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. प्रथमेशच्या या पोस्टवर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. स्पृहा जोशी, श्रेया बुगडे, कार्तिकी गायकवाड, सुकन्या मोने, प्रियांका बर्वे यांच्यासह अनेकांनी प्रथमेश-मुग्धाचं अभिनंदन केलं आहे. कार्तिकी गायकवाडने कमेंटमध्ये म्हटलं आहे की, ये बात... खूप खूप अभिनंदन... तर सुकन्या मोने यांनी म्हटलं आहे की, कल्पना होतीच... पण नक्की ना! काहीतरी गुगली नाही ना? तर संगीतकार राहुल देशपांडे यांनी देखील दोघांचंही अभिनंदन केलं आहे. मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या चाहत्यांकडूनही या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

प्रथमेश रत्‍नागिरी जिल्ह्यातील आरवली गावात राहणारा आहे. तर, मुग्धानं गायनाबरोबर नृत्याचं देखील शिक्षण घेतलं आहे. अनेकदा मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे सोशल मीडियावर एकत्र गाणी गाताना देखील दिसतात. आतापर्यंत अनेक गाणी या दोघांनी एकत्र गायली आहेत. हे दोघे नेहमी गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात आणि या जोडीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. सारेगमप लिटील चॅम्पमधील ही चिमुकली मुलं आता मोठी झाली आहेत. आजवर सर्वजण त्यांना लिटिल चॅम्प म्हणून संबोधत होते, पण आता ही मुलं मोठी झाली आहेत. प्रथमेशने प्रेमाची कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का दिला असून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा:

Maharashtra Television News : 'आई कुठे काय करते !' ते 'तुझेच मी गीत गात आहे’; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या...

महत्त्वाच्या बातम्या

Top 10 films highest Opening Day collection: भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 
भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 
Lust Stories 3 Trailer: वासना, भावना अन् नात्याच्या आतल्या गोष्टी; Netflixच्या बहुचर्चित वेबसिरीजचा 2 मिनिट 19 सेकंदांच्या Trailerचा धुमाकूळ
वासना, भावना अन् नात्याच्या आतल्या गोष्टी; Netflixच्या बहुचर्चित वेबसिरीजचा 2 मिनिट 19 सेकंदांच्या Trailerचा धुमाकूळ
Deool Band 2 OTT: 100 कोटींवर कमाई, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' आता OTT वर धडकला; कुठे पहाल?
100 कोटींवर कमाई, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' आता OTT वर धडकला; कुठे पहाल?
Seema Haider Video: सचिन मीना कुठे गेला? सीमा हैदरचा शेअर केलेल्या व्हिडीओत दिसला वकीलांचा फोटो, युजर म्हणाले,
सचिन मीना कुठे गेला? सीमा हैदरचा शेअर केलेल्या व्हिडीओत दिसला वकीलांचा फोटो, युजर म्हणाले, "मागे...."

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...कॅनडाबाबत म्हणाले...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Embed widget