एक्स्प्लोर

Sarang Paula Marriage Decision : इराण-इस्त्रायलचं युद्ध, पॉला विमानात असताना खाली 300 मिसाईल डागलेले अन् पॉलाचा तो मॅसेज, त्यामुळे आमचं लग्न करायचं ठरलं

Sarang Paula Marriage Decision : पॉला म्हणाली, माझ्या पालकांचा दिवस झाला होता. त्यामुळे मला लग्न करायचं नव्हतं, पण त्या घटनेनंतर आम्ही लग्न करायचं ठरवलं.

Sarang Paula Marriage Decision : सोशल मीडियावर मराठी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या भाडीपा या लोकप्रिय चॅनलमधून घराघरात पोहोचलेलं जोडपं म्हणजे पॉला आणि सारंग साठ्ये (Sarang Paula Marriage Decision). तब्बल १२ वर्षांच्या नात्यानंतर अखेर या दोघांनी लग्नबंधनात (Sarang Paula Marriage) अडकत आपली साताजन्माची गाठ बांधली आहे. २८ सप्टेंबर रोजी परदेशात त्यांच्या विवाह सोहळा (Sarang Paula Marriage) पार पडला. या खास क्षणी दोन्ही कुटुंबातील जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. सारंग साठ्येनं लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना या आनंदाच्या क्षणाचा भाग बनवलं होतं, दरम्यान या आधुनिक जगात सध्या लिव्ह इन आणि लग्नाशिवाय सोबत राहणं अनेकजण पसंत करतात. पण लग्न का करावसं वाटलं, आजकालची तरूण पिढी म्हणते कशाला लग्न वगैरे लिव्ह इन आहे ठिक आहे ना, लग्न का करणं महत्त्वाचं आहे, याबाबत पॉला आणि सारंग साठ्ये यांनी एबीपी माझाशी बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांच्या लग्न करण्याचा निर्णय कसा झाला त्यावर भाष्य केलं आहे.(Sarang Paula Marriage Decision)

Sarang Paula Marriage Decision : इराणने 300 मिसाईल इस्रायलवर डागले

पॉला म्हणाली, माझ्या पालकांचा डिव्होर्स झाला होता. त्यामुळे मला लग्न करायचं नव्हतं. पण एक दिवशी मी अमेरिकेवरून भारतात येत होते. जेव्हा आम्ही आवकाशात होतो, तेव्हा इराणने 300 मिसाईल इस्रायलवर डागले आणि आम्ही इराक वरून जात होतो त्यावेळी प्लेन पुन्हा माघारी परतलं. त्यावेळी त्यांनी प्लेनमध्ये अनाउन्स केलं. इराणने इस्रायलवर मिसाईल डागले आहेत. ते सर्व ऐकून सर्वजण खूप घाबरले, मला त्यावेळी खूप त्रास झाला. पुढे सारंग साठ्ये म्हणाला, त्रास कोणालाही झाला असता कारण खालून मिसाईल चालले आहेत. आपण प्लेन मध्ये आहोत. काय होईल काय नाही. यामुळे कोणीही घाबरून जाईल. नंतर पॉला म्हणाली जेव्हा मी पॅरिसला पोहोचले. तेव्हा एका दिवसानंतर मी विचार करू लागले. असं काही घडलं तर आम्ही दोघं एका देशात नसू, मी भारतात जाऊ शकत नसेल आणि तो माझ्याकडे येऊ शकत नसेल, तर आम्ही ठरवलं फक्त एका कागदपत्राचीच गोष्ट आहे, जर तो एक कागद आपल्याला एक कपल म्हणून सर्वाधिकार देत असेल. तर काय हरकत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

Sarang Paula Marriage Decision : ती त्यादिवशी पोहोचलीच नाही

पुढे सारंग साठ्ये म्हणाला, तो आमचा फर्स्ट हॅन्ड एक्सपिरीयन्स होता. असे प्रसंग ऐकलेले असतात पण पहिल्यांदा ते अनुभवात होतो. घर घेताना त्रास झाला होता, 100 घर बघायला लागतात, मग कोणीतरी तयार होतं, तेही सहन करण्यासारखी गोष्ट आहे, या आपल्या हातातल्या कंट्रोल मधल्या गोष्टी आहेत, माझ्या दृष्टीकोनातून असं झालं की, मी तेव्हा इकडे दिन दिन दिवाळी गाणं शूट करत होतो, ती रात्री शूटसाठी इथे पोहोचणार होती. ती पण त्या गाण्यात असणार होती. ती त्यादिवशी पोहोचलीच नाही. तिचा मेसेज येत नव्हता. कॉल लागत नव्हता. पहाटे एक मेसेज आला. नो मॅटर व्हॉट रिमेंबर आय लव्ह यू. त्यावेळी मला दडपण आलं. हिला काही झालं आहे का? काय होतंय? त्यानंतर थोड्या वेळाने तिचा फोन आला. तेव्हा तीने सांगितलं आम्ही अवकाशात होतो, तेव्हा तो मेसेज पाठवला होता. भीती होती काय होईल. आम्हाला पहिल्यांदा ते जाणवलं की, आम्ही दोन वेगळ्या देशातली लोक आहोत. आम्ही एका देशातले नाहीत की उद्या काय झालं, युद्ध वगैरे सुरू झालं किंवा कोणतीही घटना घडली तर, तिचं सरकार किंवा आपलं सरकार आम्हाला दोघांना एकमेकांकडे जाण्यासाठी मदत करेल. कारण कागदोपत्री तसं काहीच प्रूफ नव्हतं. त्यामुळे असं ठरलं की आपण कागद तरी तयार करूया. आपल्याला काय एक सहीच करायची आहे, इतका का अट्टाहास आहे, पुढे आपण एकत्र राहणार असू तर तसंच करूया त्यानंतर आम्ही निर्णय घेतला.

Sarang Paula Marriage Decision : आपण सह्या करणार आहोत तर त्यांच्या साक्षीने करू

सारंगने पुढे सांगितलं की, मागच्या होळीला माझ्या आईचा एक खूप मोठा अपघात झाला होता. तिचा एक हात आणि दोन्ही पाय फक्त प्लास्टर नाही तर अनेक सर्जरी झाल्या होत्या. त्यानंतर ती उभी राहील की नाही ही शंका होती. ती उभी राहिली स्वतःच्या हिमतीवर बळावर तिच्या पायांवर उभी राहिली, पण आम्हाला लक्षात आलं, माझ्या आईचं वय झालंय, वडीलही गेलेले आहेत. तिच्या वडिलांच्या दोन्ही गुडघ्यांच्या सर्जरी झालेली आहे. असा कधी प्रसंग येणार आहे, जेव्हा आमचे कुटुंब एकत्रित येणार आहे. 
तर आपण सह्या करणार आहोत तर त्यांच्या साक्षीने करू. या दोन्ही फॅमिलींना एकत्र आणू. असंही सारंगने सांगितलं.

Sarang Paula Marriage Post: लग्नानंतर फोटोसोबतची सारंगची पोस्ट

होय आम्ही लग्न केलंय! तुम्हाला माहितीच आहे की लग्न आमच्यासाठी कधीच प्राधान्य नव्हतं. खरं तर, फक्त एक गोष्ट जी आम्हाला वेगळं करत होती ती म्हणजे कागदाचा तुकडा. मागील वर्ष खूप कठीण होतं. जगात संघर्ष सुरू होता. द्वेष इतका जास्त होता की पहिल्यांदाच आम्हाला वेगळे होण्याची भीती वाटत होती. पण प्रेम नेहमीच द्वेषावर विजय मिळवतं.

आमचे प्रेम आणि मैत्री अबाधित ठेवण्यासाठी आम्हाला काल, २८/०९/२०२५ रोजी तो कागद मिळाला. लग्न हा एक वैयक्तिक विषय होता. आमचे जवळचे कुटुंब आणि काही मित्र डीप कोव्हमधील आमच्या आवडत्या झाडाभोवती जमले होते... आमच्या कुटुंबांना एकत्र आणण्याची ही एक उत्तम संधी होती. आम्ही एकमेकांना गोष्टी सांगितल्या, गाणी गायली आणि एकमेकांना वचन दिलं की आम्ही जसे आहोत तसंच राहण्याचा, प्रेम करण्याचा आणि सर्वोत्तम मित्र राहण्याचा प्रयत्न करू! तर ही आमची छोटीशी गोष्ट आहे! प्रेम नेहमीच जिंकतं!

Sarang Paula First Meet: दोघांची पहिली भेट कुठे झाली?

सारंग आणि पॉलाची पहिली भेट ही खास होती. टोरोंटो फेस्टिव्हलच्या एका पार्टीत दोघे भेटले होते. सारंगनं एका मुलाखतीत पहिल्या भेटीची आठवण सांगितली होती. सारंग आधी चित्रपटांमध्ये अधिक काम करायचा आणि अनेक पुण्यातील नाट्यसंस्थांसह जोडला होता. पॉलाही शॉर्ट फिल्मसाठी आली होती. त्यावेळी त्यांची भेट झाली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget