आता सारा तेंडुलकरकडूनही खुशखबर, वहिनीसोबत साराची पहिली झलक, सासरेबुवा सचिनसोबत लाडक्या सुनेचा पहिला फोटो
Sara Tendulkar : आता सारा तेंडुलकरकडूनही खुशखबर, वहिनीसोबत साराची पहिली झलक, सासरेबुवा सचिनसोबत लाडक्या सुनेचा पहिला फोटो

Sara Tendulkar : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या मुलाने म्हणजेच अर्जुन तेंडुलकरने नुकताच त्याचा साखरपुडा उरकला आहे. त्यानंतर आता सचिनच्या मुलीने (सारा तेंडुलकर) एक आनंदाची बातमी दिली आहे. सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हिने मुंबईत एक पिलेट्स अकॅडमी सुरू केली आहे. विशेष म्हणजे अर्जुनच्या साखरपुड्यानंतर या अकॅडमीचे उद्घाटन झाले, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, त्यांची पत्नी आणि होणारी सानिया चंडोक दिसून आल्या. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा सचिन आणि सानिया एका फोटोमध्ये दिसले.
सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर हिने मुंबईत पिलेट्स अकॅडमी सुरू केली आहे, ज्याची पहिली शाखा दुबईत होती. ही अकॅडमी तिने मुंबईच्या अंधेरी भागात सुरू केली आहे. पिलेट्स अकॅडमीमध्ये शरीराच्या कोर स्नायूंना बळकट करणे, शरीराची ठेवण सुधारण्यावर आणि लवचिकता वाढवण्यावर भर दिला जातो. पिलेट्स हा एक व्यायाम प्रकार आहे, जो शरीर आणि मनाच्या नात्यावर विशेष भर देतो.
View this post on Instagram
सचिन तेंडुलकरसोबत सानिया चंडोक पहिल्यांदाच झळकली
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा साखरपुडा कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थित करण्यात आला आणि तो माध्यमांपासून दूर ठेवण्यात आला. 12 ऑगस्ट रोजी झालेल्या साखरपुड्याची बातमी बुधवारी समोर आली. अजूनही साखरपुड्याचे फोटो सार्वजनिक झालेले नाहीत. या समारंभाला फक्त कुटुंबातील जवळचे नातेवाईक आणि दोन्हीकडील काही मित्र उपस्थित होते. साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच सचिन आणि त्यांची होणारी सून सानिया एकत्र दिसले.
सचिन तेंडुलकर यांनी नारळ फोडून सारा तेंडुलकरच्या अकॅडमीचे उद्घाटन केले. व्हिडिओमध्ये सचिन यांच्या मागे अंजली तेंडुलकर (पत्नी), सारा (मुलगी) आणि हिरव्या रंगाच्या सूटमध्ये सानिया (अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी) पाहायला मिळाली.
सानिया चंडोक कोण आहे?
सानिया आणि अर्जुन हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. सानिया ही साराचीही चांगली मैत्रीण आहे. ती मुंबईतील एका मोठ्या व्यावसायिक घराण्यातील आहे. सानिया या रवी घई (इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरीचे मालक) यांच्या नात आहेत. सानियाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे आणि ती मुंबईत स्वतःचा पाळीव प्राण्यांचा स्पा सलून चालवते.
इतर महत्वाच्या बातम्या
























