एक्स्प्लोर

Sankarshan Karhade : गृहखातं,अर्थखात्याचं वाटप,थेट पांडुरंगलाच निवडणुकीला उभं राहण्याची साद घातली;संकर्षण कऱ्हाडेच्या राजकीय कवितेने पुन्हा वेधलं लक्ष

Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडेच्या राजकीय कवितेने पुन्हा एकदा साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रा

Sankarshan Karhade : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची खडाजंगी सुरु आहे. त्यातच आता विधानसभेच्या लढतीही निश्चित झाल्या असून येत्या 23 नोव्हेंबर रोजी कोण मैदान मारणार आणि कुणाच्या पदरात निराशा पडणार याची उत्सुकता असेल. पण त्याआधी महाराष्ट्रात सुरु असलेल्या अनेक नाट्यमयी घडामोडी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतायत. याच सगळ्यावर अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने (Sankarshan Karhade) पुन्हा एकदा रचलेली कविता चर्चेत आलीये. 

संकर्षणने त्याच्या या कवितेमध्ये थेट पांडुरंगलाच निवडणुकीला उभं राहण्याची साद घातली आहे. या कवितेच्या सुरुवातीलाच म्हटलं की, राजकारण आणि पांडुरंग हे दोन माझे फार आवडीचे विषय आहेत. याच विषयांवर संकर्षने डोळ्यात अंजन घालणारी कविता केली आहे. संकर्षणच्या या कवितेही प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली असल्याचं पाहायला मिळतंय. 

संकर्षण कऱ्हाडेची कविता काय?

महाराष्ट्रातली सगळी गावं तुझीच आहेत, तू अर्ज भरून पाहावं
मला वाटतं पांडुरंगा तू यंदा निवडणुकीला उभं राहावं
मग ना पावसातल्या सभा, ना प्रचाराचा घाम
तुझेच स्टार प्रचारक देवा ज्ञानबा- तुकाराम
प्रचाराच्या जाहिरातीत यांच्या ओव्या कानी पडतील
बॅनर पाहून वीट येण्यापेक्षा हात जोडले जातील…
सगळं सुखाचं होईल देवा, विपरीत काहीच घडणार नाही
आणि तू सगळ्यांचा असल्यामुळे एकही मत जात पाहून पडणार नाही
अजून तरी पांडुरंगा तुझा कोणी विरोधक नसल्याने सगळ्यांना बरंच वाटेल
आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे कोडं देखील लवकर सुटेल
पहिली टर्म असली तरी देवा बिनविरोध येशील
आणि मुख्य म्हणजे भल्याभल्यांना तुझ्या मंत्रिमंडळात घेशील
सगळ्यात पहिला मोठा निर्णय पांडुरंगा असा घे…
कायद्यासोबत गृहखातं छत्रपती शिवाजी महाराजांना दे!
मग काय टाप कोणाची, कोण कायदा हातात घेईल
अरे एका नजरेत पूर्ण महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल
लाडक्या भावांवरचं समान प्रेम जिचा आदर्श म्हणून पाहावं
त्या मुक्ताईकडे महिला व बालविकास खातं जावं
आणि साक्षरतेचे तर विठ्ठला काय दिवस येतील
बुद्धीला वैभव म्हणणारे आमचे ज्ञानदेव शिक्षणमंत्री होतील
अरे पाणी ज्यांच्या गाथेला तारून स्वत: खाली बुडलं जे सदेह आले स्वर्ग आणि तू दार उघडलं
त्या तुकोबांच्या हाती दे पुन्हा हिशेबाच्या वह्या आणि अर्थमंत्री म्हणून घे त्यांच्या ताबडतोब सह्या
एकदम झाला आवाज हो…लखलख वीज कडाडली
वीटेवरची माऊली माझ्यावरती चिडली
काय लावली केव्हापासून तुझी ही बडबड आहे…
हे सगळं होणं आता अशक्य आणि अवघड आहे
या थोरांना मंत्री करून मला CM करतोय होय
राजकारणात यांच्या नावाचा होतोय तेवढा वापर पुरेय
राष्ट्राच्या भल्यासाठी बोलतोय म्हणून केव्हाचा ऐकतोय
पण, ऐक आता एक उपाय मी मन लावून सांगतोय
माऊलीच्या रुपातला विठ्ठल बापासारखा वागला आणि जबाबदारीने राष्ट्रासाठी पुढे बोलू लागला
मला बोलला म्हणाला गाथा, ज्ञानेश्वरी, शिवचरित्र तुम्ही कोणी वाचता?
आणि मग कसं काय तुम्ही जयंती असताना डीजे लावून नाचता
या सगळ्यांना तुम्ही सोयीनुसार जातीमध्ये वाटलंत
डोक्यावरती घेतलं पण, डोक्यात नाही घातलंत.
प्रत्येक तुका-शिवाजी आहेत…जर विचारांचा घेतला वसा
सुराज्यासाठीच काम करावं मग कोणीही खुर्चीत बसा!
आणि कर्तृत्वाची वेळ आहे आता नको नुसती बडबड
आधी मतदानाला वारी समजून तू घराबाहेर पड…
आम्ही सगळे पाठिशी आहोत तुम्ही खुशाल राहा
अरे समोर महाराष्ट्र उभा आहे त्याच्यात पांडुरंग पाहा… 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SmrutiGandha स्मृतिगंध (@smrutigandhamarathi)

ही बातमी वाचा : 

याचसाठी केला होता अट्टाहास सारा! काम सोडून 95 दिवस शाहरुखच्या घराबाहेर तळ ठोकला, अखेर किंग खानच्या वाढदिवसाला चाहत्याची 'मन्नत' पूर्ण झालीच

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Embed widget