याचसाठी केला होता अट्टाहास सारा! काम सोडून 95 दिवस शाहरुखच्या घराबाहेर तळ ठोकला, अखेर किंग खानच्या वाढदिवसाला चाहत्याची 'मन्नत' पूर्ण झालीच
Shah Rukh Khan: शाहरुखच्या घराबाहेर त्याचा एक चाहता जवळपास 95 दिवसांपासून तळ ठोकून होता. पण शाहरुखने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्या चाहत्याची भेट घेऊन त्याची इच्छाही पूर्ण केली आहे.

Shah Rukh Khan: शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) देशातच नव्हे तर जगभरात कोट्यवधी चाहते आहे, जे त्याची एक झलक पाहण्यासाठी कायमच आतुर असतात. शाहरुखने 2 नोव्हेंबर रोजी वयाच्या साठीत प्रवेश केलाय. पण सुरक्षेच्या कारणास्तव शाहरुख खान त्याच्या मुंबईतील मन्नत या बंगल्याबाहेर चाहत्यांना भेटायला आला नाही.परंतु अभिनेत्याने झारखंडमधील त्याच्या एका चाहत्याला निराश केले नाही. या चाहत्याची खास भेट शाहरुखने वाढदिवसाच्या दिवशी घेतली.
शेख मोहम्मद अन्सारी नावाचा शाहरुख खानचा हा मोठा चाहता झारखंडचा आहे. मोहम्मद अन्सारी अभिनेत्याला भेटण्यासाठी मन्नतबाहेर तब्बल 95 दिवस तळ ठोकून होता. शाहरुख खानने त्याच्या वाढदिवशी त्याच्या डाय हार्ट फॅनची भेट घेतली आणि त्याची इच्छाही पूर्ण केली. नुकताच शाहरुखसोबतचा त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुख खानच्या फॅन क्लबने हा फोटो शेअर केला आहे.
काम सोडून खास शाहरुखची भेट घेण्यासाठी आला मुंबईत
इंस्टंट बॉलीवूडशी बोलताना या चाहत्याने म्हटलं की, "शाहरुख माझा आवडता हिरो आहे. मी त्याचा सर्वात मोठा चाहता आहे. मला त्याला भेटायचे होते. त्याला भेटणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस होता. मी माझा व्यवसायही जवळपास 35 दिवस बंद ठेवला होता. आता त्याला भेटल्यावर मी लगेच व्यवसाय सुरु करण्यासाठी जाईन...
शाहरुख खानने चाहत्यांचे आभार मानले
शाहरुख खाननेही वाढदिवसाला खास बनवल्याबद्दल इंस्टाग्रामवर चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याची आयकॉनिक पोज देतानाचा फोटो शेअर करताना त्याने लिहिले, 'येथे आल्याबद्दल आणि माझी संध्याकाळ खास बनवल्याबद्दल धन्यवाद...'
LATEST : King Khan meets the FAN who had travelled from Jharkhand and had been waiting for more than 95 days outside Mannat to meet him!
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) November 4, 2024
Truly, agar kisi cheez ko pure dil se chaaho ❤️ SRK makes his dream come true ! #ShahRukhKhan #King #SRKDay #HappyBirthdaySRK pic.twitter.com/CMBN2JN7HJ
Thank you for coming over and making my evening special… my love to everyone who made it for my birthday. And for those who couldn’t, sending you all my love. pic.twitter.com/7r5YIG4HP0
— Shah Rukh Khan (@iamsrk) November 2, 2024
ही बातमी वाचा :
Abhishek Bachchan : 'पुरुष धोकेबाज असल्याचा आरोप कायमच होतो', अभिषेक बच्चन असं का म्हटलं होतं?























