एक्स्प्लोर

Sanju Rathod : सई ताम्हणकरचा 'गुलाबी साडी'वाल्या संजू राठोडला माझा महाकट्टावर प्रश्न, संजू म्हणाला, नेक्स्ट टाईम कळेलच, धमाल घेऊन येतो!

Sanju Rathod on Abp Majha Mahakatta : संपूर्ण जगाला ज्या गुलाबी साडीने वेड लावलं त्या संजू राठोडने माझा महाकट्टावर दिलखुलास संवाद साधला. 

Sanju Rathod on Abp Majha Mahakatta : प्रत्येक कलाकाराच्या डोळ्यामध्ये प्रतीक्षा असते ती केवळ एका संधीची. ती संधी कधी, कुठे आणि कशी दार ठोठावेल हे कोणालाच माहित नसतं. असेच दोन गायक युट्युबवर शिकत त्या दोघांनीही संपूर्ण जगाला वेड लावलं. अगदी सर्वसामान्य गृहिणींपासून ते बॉलीवूडच्या सिनेतारकांपर्यंत गुलाबी साडी (Gulabi Sadi) या गाण्याने सगळ्यांना भुरळ घातली. इतकचं नव्हे तर याच संजूच्या गुलाबी साडी या गाण्यावर अंबानींची वरात देखील थिरकली. त्याच संजू राठोडने (Sanju Rathod) माझा महाकट्ट्यावर दिलखुलास संवाद साधला. 

माझा महाकुट्टासाठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने देखील हजेरी लावली. त्यावेळी तिने देखील संजूला एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर संजू उत्तर देताना त्याच्या आगमी कामाविषयी देखील भाष्य केलं आहे. तसेच संजूने त्याचा प्रवास देखील माझा महाकट्टावर उलगडला आहे. त्याने त्याच्या आयुष्यात गाणं लिहिण्यास कशी सुरुवात केली याविषयी देखील त्याने सांगितलं आहे. 

गाणं लिहायला कशी सुरुवात केली?

संजूने यावर म्हटलं की, गुलाबी साडीच्या आधी माझं एक गाणं आहे नऊवारी साडी, त्याचं 140 मिलियन्स व्ह्युज आहे. गुलाबी साडी ही प्रत्येकीसाठी खास असते. त्यामुळे मी गुलाबी साडीवर गाणं लिहियाचं ठरवलं. मी गाणं आधी कंपोज करतो, मग ते गाणं लिहितो. माझ्या भावाचा विश्वास आहे की, जे पहिल्यांदा बनतं तेच चांगलं होतं. जेव्हा त्याने मला गाणं पाठवलं तेव्हा मी त्यानंतर एका तासामध्ये तयार केलं. पण गाणं बनवायच्या आधी मी तीन ते चार दिवस घेतले, त्यानंतर एका तासामध्ये हे गाणं तयार केलं. 

संजूचा थक्क करणारा प्रवास

संजूने त्याच्या प्रवासाविषयी सांगताना म्हटलं की, मी जळगांव जिल्ह्यामधील धानवड तांडा येथील आहे. संगीताचा वारसा नाही, पण घरी माझे वडील  आणि आजोबा भजन वैगरे करायचे. ते मी ऐकायचो आणि तेव्हा मला वाटलं की, आपणही हेच करावं. माझे बाबा तेव्हा दहावी नापास होते आणि माझ्या गावात माझे वडील सगळ्यात जास्त शिकलेले होते. त्यानंतर चौथीनंतर मला बुलढाण्यात आश्रमात पाठवलं. माझे वडील वेल्डिंगचं काम करतात. सुरुवातीला काय करायचं काहीच माहित नव्हतं. घरच्यांकडूनही खूप पैसे घेतले होते. मी अत्यंत मजेत या क्षेत्रात आलो. पण तेव्हा कळलं की कष्ट काय असतात, नातेवाईक काय असतात. मी इंजिनिअरिंग करत होतो. अशी वेळ आली की, मी घरुन खूप पैसे घेतले होते. म्हणजे एक वेळ अशी आली की, मी मागे वळू शकत नव्हतो.

सईचा संजूला प्रश्न

आमच्या मित्रांना युट्युबवर काही बघत असताना तुझी ओळख झाली. तेव्हा आम्ही एका रात्रीत तुझी सगळी गाणी ऐकली. तुझ्या गाण्यांचं चित्रीकरण हे टेक्निकली खूप जास्त चांगलं आहे,मराठी सिनेमांमध्ये जशी गाणी असतात त्याच्याचसारखी किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात चांगलं तुझं चित्रीकरण असतं हे सगळं कोण बघतं? असा प्रश्न सईने संजूला केला. त्यावर संजूने उत्तर देताना म्हटलं की, जवळपास 99 टक्के भाग हे आम्ही दोघं मिळूनच करतो. गोष्ट, दिग्दर्शन हे सगळं मी सांभाळून घेतो, हे मी सांभाळतो, बाकी सगळं एडिटिंग वैगरे गौरवच सांभाळून घेतो. मग हे चित्रीकरण सगळं कोण पाहतं? असाही प्रश्न सईने विचारला. त्यावर संजूने म्हटलं की,  चित्रीकरणासाठी आम्हाला आमचे मित्रच मदत करतात. आता आणखी काहीतरी आम्ही भन्नाट घेऊन येतोय. 

'आयुष्यात गौरव खूप जास्त महत्त्वाचा'

गौरवविषयी बोलताना संजूने म्हटलं की, गौरव माझ्या आयुष्यात आला तेव्हा सुरुवातीचा असा काळ होता की, दोन वर्ष आम्हाला खायला देखील पैसे नव्हते. आम्हाला रेंटवर राहायला जागा नव्हती, कुणी घर द्यायचं नाही. त्यामध्ये गौरव माझ्यासोबत असायचा. त्याने मला आयुष्यात खूप मदत केली,त्यामुळे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. इंजिनीअरिंगचा अभ्यास हा डोक्याच्या वरुन जायचा, त्यानंतर मग मी ह्या क्षेत्रात आलो. 

संजूचा सुरुवातीचा काळ कसा होता?

संजूने त्याच्या सुरुवातीच्या काळाविषयी बोलताना म्हटलं की, मी जळगांव जिल्ह्यामधील धानवड तांडा येथील आहे. संगीताचा वारसा नाही, पण घरी माझे वडिल आणि आजोबा भजन वैगरे करायचे. ते मी ऐकायचो आणि तेव्हा मला वाटलं की, आपणही हेच करावं. माझे बाबा तेव्हा दहावी नापास होते आणि माझ्या गावात माझे वडिल सगळ्यात जास्त शिकलेले होते. त्यानंतर चौथीनंतर मला बुलढाण्यात आश्रमात पाठवलं. मी दहावीला असताना मला एक मुलगी आवडायची. तिने मला एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात एक शायरी होती, जी अत्यंत हास्यास्पद होती. तेव्हापासून मी दोन-चार ओळी लिहायला लागलो. मी तिलाही एक शायरी लिहून पाठवली. मला सुरुवातीला वाटलं की, मी दहावीनंतर मस्त म्हशीवैगरे घेईन, शेती करेन, दुधाचा व्यवसाय करेन असं ठरवलं. 

पुढे त्याने म्हटलं की, मी घरातून पळून जाताना कुणाला कळू नये म्हणून शर्टवर शर्ट, पॅन्टवर पॅन्टवर चढवली. माझी आई तांदळाच्या डब्यात पैसे ठेवायची. मी जळगांववरुन निघालो आणि ट्रेनमध्ये बसलो. ती ट्रेन भुसावळला थांबली. मी बराच वेळ बसून होतो, नंतर मला कळलं की, ती मुंबईवरुन भुसावळला आली होती. मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा सुरुवातीचे दिवस सीएसटीला झोपायचो. पैसे कसे कमवायचे असा प्रश्न सारखा होता. त्यासाठी मी कर्जावर कर्ज घेत गेलो. जवळपास 15 ते 20 लाख रुपये कर्ज माझ्यावर झालं. युट्युबवर बघून मी गाणं शिकलो. मी सुरुवातीला कॉलेजमध्ये रॅप बोलायचो. माझं ब्रेकअप झालं होतं. तिच्यामुळे रॅप लिहायला लागलो. तिने मला डीच केलं होतं. तेव्हा मी एक रॅप लिहिला होता. तिथून खरी सुरुवात झाली. 

ही बातमी वाचा : 

Arshad Warsi :  दादा कोंडकेंचा फॅन अर्शद वारसी बॉलिवूडमध्ये कसा आला? 'माझा महाकट्टा'वर 'सर्किट'ची कहाणी 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget