पांढरे केस, चेहऱ्यावर सुरकुत्या, वाढदिनी 'द राजा साब'मधील संजय दत्तचा नवा लूक समोर
Sanjay Dutt First Look Out From Prabhas Film The Raja Saab : अभिनेता संजय दत्त आज त्याचा 66 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने प्रभास स्टारर 'द राजा साब' चित्रपटातील त्याचा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

Sanjay Dutt First Look Out From Prabhas Film The Raja Saab : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता संजय दत्त आज (29 जुलै) आपला 66 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिवशी प्रत्येकजण त्यांना शुभेच्छा देत आहे. या निमित्ताने 'द राजा साब' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी संजय दत्तचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करत चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
‘द राजा साब’ हा एक अनोखा हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन मारुती यांनी केले आहे. मंगळवारी प्रदर्शित पोस्टरमध्ये संजय दत्तचा खूप वेगळा आणि लक्षवेधी लूक पाहायला मिळतो. 'पीपल मीडिया फॅक्टरी' या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचं संगीत थमन यांनी दिलं आहे.
Team #TheRajaSaab wishes the Powerhouse and versatile Sanju Baba - @DuttSanjay a very Happy Birthday 💥💥
— The RajaSaab (@rajasaabmovie) July 29, 2025
Get ready to witness a terrifying presence that will shake you to the core this Dec 5th in cinemas 🔥🔥#TheRajaSaabOnDec5th#Prabhas @DirectorMaruthi @AgerwalNidhhi… pic.twitter.com/PFgPzOnqea
संजय दत्तचा लुक कसा आहे?
'द राजा साब' या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये संजय दत्त एक वृद्ध व्यक्तीच्या रूपात दिसत आहेत. लांब व पांढऱ्या केसांमध्ये आणि सुरकुत्यांनी भरलेल्या चेहऱ्यासह ते एका वेगळ्याच अवतारात दिसतात. त्यांचा हा लुक एक रहस्यमय व्यक्तिमत्त्व दर्शवतो. पोस्टरमध्ये कोळीचं जाळं आणि जीर्ण झालेलं खोलीचं दृश्य आहे. चाहत्यांना त्यांचा हा लूक खूपच आवडत आहे.
संजय दत्तच्या भीतीदायक अवतारासाठी तयार व्हा
'द राजा साब' या चित्रपटाचा पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिलं - "बहुपदवीधर प्रतिभा असलेल्या संजू बाबा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये एक अशी भीतीदायक उपस्थिती पाहायला मिळणार आहे, जी तुमचं अंत:करण हादरवून टाकेल."
'द राजा साब'ची रिलीज डेट
प्रभास आणि संजय दत्त व्यतिरिक्त 'द राजा साब' मध्ये बोमन ईरानी, मालविका मोहनन, निधी अग्रवाल, रिद्धी कुमार, व्हीटीव्ही गणेश, सप्तगिरी, समुथिरकानी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
संजय दत्तच्या वर्कफ्रंटबाबत जाणून घ्या
संजय दत्तच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे पाहिलं, तर 'द राजा साब' व्यतिरिक्त त्यांच्या हातात बोयापती श्रीनू यांचा 'अखंड 2' हा अॅक्शन भरलेला चित्रपट आहे. त्याचबरोबर टायगर श्रॉफचा 'बाघी 4' देखील आहे, ज्यामध्ये संजय दत्त पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटात ते रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करताना दिसतील.
इतर महत्वाच्या बातम्या
1 हजार सिनेमांमध्ये काम, लोकप्रिय आजी आई बनू शकली नाही, मुलगी दत्तक घेतली, आता नातही झाली हिरोईन























