एक्स्प्लोर

Sangeet Manapmaan : नवीन वर्षात मराठी परंपरेचा साज सजणार ; “संगीत मानापमान" 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Sangeet Manapmaan : सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान" सिनेमा नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sangeet Manapmaan : जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे (Subodh Bhave) यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट "संगीत मानापमान" (Sangeet Manapmaan) 10 जानेवारी 2025 ला प्रदर्शित होणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलीये. सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले असून सुबोध भावे बरोबर सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी ही त्रयी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 
 
सुबोध भावेचा पहिला पोस्टर जेव्हा रिलीज झाला तेव्हाच या चित्रपटाची चर्चा सर्वत्र होऊ लागली होती. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. वैदेहीचे नऊवारीतील विलोभनीय सौंदर्य आणि मराठमोळा साज तर राजबिंडा पारंपरिक पोशाख मधला सुमित राघवनचा लुक पाहता या चित्रपटाची भव्यता पाहायला मिळतेय. प्रेम, वीरता, शौर्य यांची गुंफण असलेले 'संगीत मानापमान' नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाची अविस्मरणीय भेट ठरणार आहे.

'अभिजात अशा नाट्यकृतीवर काम करायला मिळणं...'

सुबोध या सिनेमाविषयी बोलताना म्हणाला की, "संगीत मानापमान या मराठीतल्या एका अत्यंत अभिजात अशा नाट्यकृतीवर काम करायला मिळणं ही खरोखरंच बालगंधर्व चित्रपटात बालगंधर्वंची भूमिका करत असताना मानापमान या नाटकाशी संबंध आला. पण कधी तरी आपण त्याच्यावरती सिनेमा करू असा वाटलं देखील नव्हतं.मधल्या काळात कट्यार नंतर नवीन चित्रपटाची आखणी करताना सगळ्यात भावलं ते म्हणजे मानापमानची प्रेम कथा तसेच गोविंदराव टेंबेंसारख्या दिग्गज अशा संगीतकाराने संगीतबद्ध केलेली गाणी. इतक्या वर्षानंतर ही गोडी तशीच आहे. बालगंधर्व असतील केशवराव भोसले असतील, दीनानाथ मंगेशकर असतील अशा दिग्गज कलाकारांचा स्पर्श,खाडीलकरांची लेखणी अशा वेगवेगळ्या अंगानी नटलेल्या नाटकावर सिनेमा तितक्याच तोलामोलाची मंडळी आजूबाजूला हवी होती.

पुढे सुबोधने म्हटलं की,  'जिओ स्टुडिओजची भक्कम साथ,कट्यार आणि काशिनाथच्या वेळेसजी माझ्यासोबत टेक्निकल टीम होती ती देखील तितक्याच ताकदीने माझ्यासोबत उभी राहिली. सुमित राघवन, वैदेही आणि बरेच कलावंत आहेत, ज्यांची नावं लवकरच तुमच्यासमोर येतील त्यांचा माझ्यावरचा विश्वास. मला असा वाटतं की, हा सिनेमा फक्त सुबोध भावेचा नसून संपूर्ण टीमचा सिनेमा आहे आणि नवीन वर्षाची आमच्या 'संगीत मानापमान' टीम तर्फे सर्व रसिक प्रेक्षकांना ही संगीतमय प्रेम कथाभेट असणार आहे.'

या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार असून, ‘कट्यार काळजात घुसली‘ तसंच ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर‘ या चित्रपटाची संपूर्ण तांत्रिक टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे.  त्याचबरोबर मुख्य म्हणजे प्रसिध्द संगीतकार शंकर -एहसान - लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे.जिओ स्टुडिओज प्रस्तुत, निर्माती ज्योती देशपांडे निर्मित, श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित, “संगीत मानापमान" ह्या संगीतमय चित्रपटात वैदेही परशुरामी, सुमित राघवन सोबत आणखी काही दिग्गज कलाकार असणार आहेत.  

View this post on Instagram
 
A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

ही बातमी वाचा : 

Nikki Tamboli : अरबाजवरच्या प्रेमाची निक्कीने दिली कबुली? म्हणाली, 'आमच्यात जे काही ते उघडपणे....'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget