Nikki Tamboli : अरबाजवरच्या प्रेमाची निक्कीने दिली कबुली? म्हणाली, 'आमच्यात जे काही ते उघडपणे....'
Nikki Tamboli : बिग बॉसच्या घराच्या बाहेरही निक्की आणि अरबाजच्या नात्याविषयी बरीच चर्चा सुरु आहे. त्यातच आता निक्कीने त्यांच्या नात्यावर दिलेल्या स्पष्टीकरणाविषयी बरीच चर्चा सुरु आहे.
Nikki Tamboli on Arbaz Patel: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi New Season) घरातल्या जशी भांडणांची चर्चा झाली, त्याचप्रमाणे घरातल्या नात्यांचीही बरीच चर्चा झाली. बिग बॉसच्या घरात कायमच कोणतंतरी नवं नातं बहरतचं असतं. बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमध्ये शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांच्या नात्याची बरीच चर्चा होती. बिग बॉसच्या घराबाहेरही ते एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचं नातं काही फार टिकू शकलं नाही. बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्येही एका कपलची जोरदार चर्चा होती. इतरकच नव्हे तर घराच्या बाहेर आल्यानंतरही हे दोघे एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेल (Arbaz Patel) यांच्या नात्याची सध्या बरीच चर्चा आहे.
निक्की आणि अरबाज त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचे बरेच एकत्र फोटो शेअर करताना दिसतायत. नुकतच निक्की आणि अरबाजने त्यांच्या सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर केले आहेत. त्यावर त्या दोघांच्या कॅप्शन आणि पोझने विशेष लक्ष वेधून घेतलंय. त्यातच आता निक्कीने अरबाज आणि तिच्या नात्याविषयी केलेल्या वक्तव्यांनी साऱ्यांच्याच भुवया उंचवल्या आहेत. त्यामुळे निक्की आणि अरबाज खरंच एकमेकांना डेट करत आहेत की केवळ चर्चेत राहण्यासाठी हे सगळं सुरु आहे असा प्रश्न सध्या अनेकांना पडलाय.
निक्कीने दिली प्रेमाची कबुली?
दरम्यान निक्कीने नुकतीच अल्ट्रा मराठी बझला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. यावेळी निक्कीला अरबाजसोबतचा फोटो हॉर्ट इमोजी टाकत शेअर केला होता, त्याविषयी विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना निक्कीने म्हटलं की, आमच्यामध्ये जे काही आहे ते आहे. मग ते प्रेम असेल किंवा आणखी काही. पण ते सगळं उघडपणे आहे. आम्ही दोघंही एकमेकांना आवडतो. त्यानंतर तिला अरबाजचं एका शब्दांत वर्णन करायला सांगितलं. तेव्हा तिने म्हटलं की, मी अॅक्शन करुन दाखवते. मग तिने हॉर्ट केलं आणि म्हणाली हे प्रेम मैत्रीही असू शकते. प्रत्येक मुलगा आणि मुलगी कपलच आहेत, असं नसतं. आमच्यात मैत्रीतलं प्रेम आहे.
बिग बॉसच्या घरात जेव्हा कुटुंबिय भेटायला गेले होते, तेव्हा निक्कीच्या आईने अरबाजविषयी एक धक्कादायक खुलासा निक्कीजवळ केला होता. अरबाजचा साखरपुडा झाला असून तो बाहेर कमिटेड आहे, असं तिने सांगितलं होतं. इतकच नव्हे बिग बॉसच्या घरात स्वत: अरबाजने तो कमिटेड असल्याचं कबुल केलं होतं. पण जेव्हा घरातले एलिमिनिटेड झालेले सदस्य पुन्हा घरात गेले तेव्हा अरबाजने निक्कीचा गैरसमज दूर केले.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
तारक मेहताचा 'टप्पू' लग्नबंधनात अडकणार? अभिनेत्याने 'बबीता जी'सोबतच्या नात्यावर मौन सौडलं