एक्स्प्लोर

Sameer Khandekar on Daughter School:'लेकीसाठी मराठीच शाळा हवी...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, दादरमध्ये मराठमोळं रेस्टॉरंटही सुरू केलं, सांगितला किस्सा

Sameer Khandekar on Daughter Dadar Marathi School: मराठी अभिनेता समीर खांडेकरने लेकीसाठी मराठी शाळेची निवड केली.

Sameer Khandekar on Daughter Marathi School: मराठी अभिनेता समीर खांडेकरने (Sameer Khandekar) दादर येथे 'पिठी भात' (Pithi Bhaat) नावाचं रेस्टॉरंट सुरु केलं. स्वत:चा व्यवसाय सुरू केल्यापासून अभिनेता चर्चेत आहे. 'पिठी भात' या रेस्टॉरंटमध्ये खास मालवणी शाकाहारी पदार्थ मिळतात. त्यानं एका मुलाखतीत रेस्टॉरंट सुरु करण्यामागचा किस्सा सांगितला. तसेच मुलीला मराठी शाळेत घालण्यामागचं कारणही सांगितलं.   बोरिवली, गोरेगाव मग दादरपर्यंत हा प्रवास कसा पोहोचला, याबद्दलचाही किस्सा अभिनेत्याने मुलाखतीत शेअर केला. 'पिठी भात' हा रेस्टॉरंट सुरू करण्यामागचा नेमका किस्सा काय? पाहूयात.

मराठी अभिनेत्याने  लेकीसाठी मराठी शाळेची निवड केली (Sameer Khandekar on Daughter marathi school)

अलिकडेच समिर खांडेकर याने  राजश्री मराठीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत समीर म्हणाला, 'मी  मूळचा लालबागचा पण  लग्नानंतर मी बोरिवलीत राहायला गेलो.  माझं घर छान होतं. माझी मुलगी मोठी होत गेली.  आम्हा दोघांचे लेकीच्या शाळेबाबत एकच विचार होता.  आम्हा दोघांना मुलीला मराठी शाळेत घालायचे होते. आम्ही गोरेगाव येथील शाळेत मुलीचं अॅडमिशन केलं. मग आम्ही बोरिवली  सोडून गोरेगावमध्ये शिफ्ट होण्याचं ठरवलं'.

'मग माझ्या डोक्यात एक विचार आला की, आपण बोरिवलीहून गोरेगावला जाऊ शकतो तर आणखी पुढे का नाही.   मग माझ्या डोक्यात बालमोहन विद्यामंदिर शाळेचा विचार आला होता.   मी यासंदर्भात मित्राला विचारलं.  अॅडमिशन फुल्ल झाले आहेत, अशी माहिती मिळाली. मी  शाळेतील सरांना भेटलो. मुलीसाठी मराठी शाळेत अॅडमिशन हवं आहे असं सांगितलं. दुसऱ्या  दिवशी फॉर्म भरला आणि अॅडमिशन झालं', असं अभिनेता म्हणाला. 'अॅडमिशनचं झाल्यानंतर मला माझी पत्नी, आता दादर ना... असं म्हणाली'

'आता लेकीचं अॅडमिशन तर झालं,  शिफ्ट पण व्हावं लागेल. सुरुवातीला आम्ही  भाड्याने राहिलो. मग माझं  रेस्टॉरंटचं प्लॅनिंग सुरु झालं.  आम्ही  दादरमध्ये रेस्टॉरंटसाठी जागा शोधत होतो.  सुरुवातीला आमचं स्वत:चं घर होतं पण दादरमध्ये आम्ही काही दिवस भाड्याने घर घेऊन राहिलो.   पण दादरमध्येही आम्ही स्वत:चं घर घेतलं.   नंतर गुजराती बंधू गोयल यांच्याकडून जागाही मिळाली.  दादरमध्ये आज लेकीला मराठी शाळेत घातली. स्वत:चं घर आणि मराठमोळं रेस्टॉरंट उभं राहिलं. यात आई आणि पत्नीचा मोठा वाटा आहे', असं समीरने सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget