Samantha Ruth Prabhu Relationship Updates : नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर आता समंथालाही सापडला 'द फॅमिली मॅन'; पुढचं पाऊल टाकणार?
Samantha Ruth Prabhu Relationship Updates : नागा चैतन्य याने आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे समंथाही आपल्या वैवाहिक आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात करणार असल्याची चर्चा आहे.
Samantha Ruth Prabhu Relationship Updates : दाक्षिणात्य स्टार अभिनेता नागा चैतन्य ( Naga Chaitanya) आणि अभिनेत्री शोभिता धुलीपाला ( Sobhita Dhulipala) यांचा 8 ऑगस्ट रोजी साखरपुडा पार पडला. अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सोबतच्या नात्याला पूर्णविराम दिल्यानंतर नागा चैतन्य याने आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे समंथाही आपल्या वैवाहिक आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात करणार असल्याची चर्चा आहे. समंथाचे नाव एका दिग्दर्शकासोबत जोडले जात आहे.
समंथाच्या आयुष्यात कोणाची एन्ट्री?
नागा चैतन्यसोबत झालेला घटस्फोट, त्यानंतर सामोरे जात असलेले आजारपण यामुळे चाहत्यांना समंथाची काळजी वाटत होती. समंथाने आता आपल्या आयुष्यात मुव्ह ऑन करण्याचा निर्णय घेतला आहे. 'बॉलिवूड लाईफ' च्या वृत्तानुसार, 'द फॅमिली मॅन'चा दिग्दर्शक राज (Raj Nidimoru) आणि समंथा प्रभू यांच्या अफेअरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राज यांनी डीकेसोबत 'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शन केले. समंथा आणि राज या दोघांनी दोन ओटीटी प्रोजेक्टसाठी काम केले आहे. समंथाने याआधी 'द फॅमिली मॅन 2'च्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले होते. आता समंथा ही राज यांच्या 'सिटाडेल: हनी बन्नी'मध्ये झळकणार आहे.
या वृत्तानुसार, राज यांचे लग्न झाले आहे. मात्र, आता ते समंथाच्या प्रेमात पडले असल्याचे म्हटले जात आहे.
मात्र, राज आणि समंथा यांच्या डेटिंगच्या वृत्तात किती तथ्य आहे, याला दुजोरा देणारे कोणतेही वृत्त समोर आले नाही. या दोघांनीदेखील डेटिंगबाबत, रिलेशनशीपच्या वृत्तावर कोणतेही भाष्य केले नाही.
View this post on Instagram
नागा चैतन्यसोबत झाला घटस्फोट...
समंथा आणि नागा चैतन्यचा 2017 मध्ये प्रेमविवाह झाला होता. मात्र, 2021 मध्ये या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी कपल वेगळे झाल्याने चाहत्यांना धक्का बसला होता.
घटस्फोटाच्या तीन वर्षानंतर नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत साखरपुडा केला. मागील काही महिन्यांपासून दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, त्यांनी यावर भाष्य केले नव्हते. अखेर साखरपुडा करत दोघांनी आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले.