एक्स्प्लोर

Samantha Ruth Prabhu : ‘माझ्या मौनाला कमजोरी समजू नका!’, समंथाचा इशारा नेमका कोणाला?

Samantha Ruth Prabhu : पती-अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर समंथा प्रसिद्धी झोतात आली होती. यानंतर समंथानी केलेली प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती.

Samantha Ruth Prabhu : साऊथ क्वीन अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे. अभिनेत्री चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सध्या चर्चेत आहे. पती-अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर समंथा प्रसिद्धी झोतात आली होती. यानंतर समंथानी केलेली प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. आताही समंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अशी एक पोस्ट केली आहे, जी तिच्या चाहत्यांना आवडली आहे.

समंथा प्रभूने तिच्या ट्विटर अकाउंटवरून नुकताच एक कोट ट्विट केला आहे. आपल्या ट्विटमध्ये तिने म्हटलेय की, 'माझ्या मौनाला माझे अज्ञान समजण्याची चूक कधीही करू नका. माझ्या शांत स्वभावाला माझी मान्यता मानू नका. माझी नम्रता माझी कमजोरी मानू नका.’ इतकेच नाही, तर हा कोट शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलेय की, 'नम्रतेचीही एक्सपायरी डेट असू शकते'. अभिनेत्रीचे हे ट्विट तिच्या चाहत्यांमध्ये चांगलेच व्हायरल होत आहे.

पाहा पोस्ट :

कोणाला होता इशारा?

समंथाचा हा कोट पाहिल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. घटस्फोटानंतर समंथाला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. मात्र, तिने नेहमीच शांत राहणे पसंत केले. मात्र, आता तिचा हा इशारा असंच ट्रोल करणाऱ्या लोकांसाठी आहे, असे म्हटले जात आहे. दुसरीकडे, तिचा माजी पती नागा चैतन्य याच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. त्यातच समंथाचा हा इशारा चर्चेचा विषय बनला आहे.   

समंथाला होतोय टॅटूचा पश्चात्ताप

समंथाच्या शरीरावर तीन टॅटू आहेत. यातील एक टॅटू तिच्या पाठीवर आहे, ज्यामध्ये YMC म्हणजेच ‘ये माया चेसावे’ असे लिहिले आहे. हे तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट 2010 मध्ये रिलीज झाला होता, ज्यामध्ये तिचा माजी पती नागा चैतन्यने देखील मुख्य भूमिका साकारली होती. समंथाचा आणखी एक टॅटू तिच्या बरगडीवर आहे, ज्यामध्ये Chay लिहिले आहे. ‘चाय’ हे नागा चैतन्यचे टोपणनाव आहे. तिसरा टॅटू सरळ मनगटावर कोरलेला आहे, ज्यामध्ये बाणाचे चिन्ह बनवले आहे. नागा चैतन्यनेही उजव्या हाताच्या मनगटावर असाच टॅटू काढला आहे. नागासोबत घटस्फोट झाल्यानंतर समंथाला हे टॅटू काढल्याचे पश्चाताप होत आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Amol Kolhe on CJP Laathicharge: 'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
Kriti Sanon : बॉयफ्रेंडसोबत IND vs ENG  पाहायला पोहोचली कृती सेनन; धोनीच्या लेकीसोबतची धमाल चर्चेत
बॉयफ्रेंडसोबत IND vs ENG  पाहायला पोहोचली कृती सेनन; धोनीच्या लेकीसोबतची धमाल चर्चेत
Diljit Dosanjh on CJP Student Protest: शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेला गायक आता CJP आंदोलनात; दिलजीत दोसांझची पोस्ट चर्चेत, म्हणाला...
शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेला गायक आता CJP आंदोलनात; दिलजीत दोसांझची पोस्ट चर्चेत, म्हणाला...
Sonakshi Sinha On CJP Protest : '20 जुलै लक्षात ठेवा..अनेकांची हाडं मोडली, देशाचंही मन तुटलं'; जंतरमंतर आंदोलनानंतर सोनाक्षी सिन्हाने शेअर केले अस्वस्थ करणारे फोटो 
'20 जुलै लक्षात ठेवा..'; जंतरमंतर आंदोलनानंतर सोनाक्षी सिन्हाने शेअर केले अस्वस्थ करणारे फोटो, म्हणाली..

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
Embed widget