RRR : सलमानकडून RRR चं कौतुक; म्हणाला, 'आमचा चित्रपट साऊथमध्ये का चालत नाही?'
बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं (Salman Khan) आरआरआर (RRR) या चित्रपटाचं कौतुक केलं.
RRR : केवळ चार दिवसांमध्ये आरआरआर (RRR) या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 500 कोटींची कमाई केली. अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. काही सेलिब्रिटींन सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून लोकांना हा चित्रपट पाहण्यास सांगितले. नुकतच बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं (Salman Khan) आरआरआर या चित्रपटाचं कौतुक केलं.
IIFA Awards 2022 मध्ये सहभाग घेतल्यानंतर सलमाननं या कार्यक्रमाच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'चिरंजीवी यांना मी गेली कित्येक वर्ष ओळख आहे. त्यांचा मुलगा राम चरण देखील माझा मित्र आहे. त्यानं आरआरआरमध्ये चांगलं काम केलं. मी काही दिवसापूर्वी त्यांच्या बरोबर संवाद साधला. तेव्हा मी त्याला सांगितलं की तु खुप चांगलं काम करत आहे. मी त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या. मला ही गोष्ट कळत नाही की आमचा चित्रपट साऊथमध्ये एवढा का चालत नाही?'
चित्रपट निर्मात्यांना सल्ला देत सलमाननं सांगितलं, 'हिरोइजमला प्रेक्षकांची पसंती मिळाली. कारण लोक या चित्रपटांसोबत कनेक्ट होतात. सलीम-जावेद यांच्या काळात हिरोइजम हा फॉर्मट फॉलो करत होते.'
सलमान खानचा आगामी 'टायगर 3' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. सलमानच्या दबंग, बजरंगी भाईजान,अंतिम-द फायनल ट्रुथ, मैने प्यार किया, या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तसेच सलमानचा 'कभी ईद कभी दिवाली' हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- KGF Chapter 2 : यशने लिहिलेत 'KGF 2' सिनेमातील डायलॉग, दिग्दर्शकाने केला खुलासा
- RRR : राजामौलींचा 'आरआरआर' लवकरच होणार 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha