Salman Khan: साठाव्या वाढदिवसाआधी भाईजाननं बदलला लुक; नवा लुक पाहून चाहते हैराण, म्हणाले,' खरंच..'
त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून चाहत्यांकडून भरभरून कौतुक होत आहे. फिटनेस, स्वॅग आणि स्टाइल यामुळे सलमान पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आला आहे.

Salman Khan: बॉलीवूडचा ‘दबंग’ सलमान खान (Salman Khan) आजही इंडस्ट्रीतील सर्वात हँडसम अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. पन्नाशीच्या शेवटच्या टप्प्यात असतानाही त्याची चार्मिंग पर्सनॅलिटी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. लवकरच सलमान 60व्या वर्षात पदार्पण करणार आहे; मात्र त्याचा सध्याचा लुक पाहून चाहते म्हणायला लागले आहेत की भाईजान अजूनही 40च्या आसपासच दिसतो.
सध्या सलमान खान आपल्या लेटेस्ट लुकमुळे सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून चाहत्यांकडून भरभरून कौतुक होत आहे. फिटनेस, स्वॅग आणि स्टाइल यामुळे सलमान पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आला आहे.
भावाच्या वाढदिवसात भाईजानचा स्वॅग
सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खान (Sohail Khan) याने 20 डिसेंबर रोजी आपला 55वा वाढदिवस साजरा केला. भावाचा वाढदिवस आणि सलमान गैरहजर, असं कसं होणार? बिझी शेड्यूल असूनही सलमान खास मुंबईत परतला. या दरम्यान तो मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला आणि तिथूनच त्याचा स्वॅगी लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला.
59व्या वर्षीही कडक लुक
59 वर्षांचा असतानाही सलमान खानचा लुक पाहून अनेकजण थक्क झाले. एअरपोर्टवर तो भारी सिक्युरिटीसह दिसला. ब्लॅक जीन्स, नेव्ही ब्लू टी-शर्ट आणि ब्राउन शेड चष्मा अशा लूकमध्ये सलमान प्रचंड हँडसम दिसत होता. त्याची फिटनेस आणि कॉन्फिडन्स पाहून चाहत्यांनी पुन्हा एकदा “भाईजान इज अनस्टॉपेबल” असं म्हणायला सुरुवात केली.
Bhaijaan's Aura Is Unmatched - Truly One Of a Kind , Just Like #SalmanKhan 🔥 pic.twitter.com/ELD9uM9mjN
— Filmy_Duniya (@FMovie82325) December 20, 2025
‘किक 2’साठी बदलला लुक?
स्वॅगमध्ये एअरपोर्टवरून थेट सोहेलच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या सलमानने पॅपराझींना पोझही दिल्यात. त्याचा क्लीन शेव लुक पाहून अनेकांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे की तो ‘किक 2’ (Kick 2) च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याआधी ‘बॅटल ऑफ गलवान’साठी त्याने मिशा वाढवल्या होत्या; मात्र आता त्याचा फ्रेश, क्लीन लुक दिसत आहे.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
सलमानच्या या लुकवर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतो आहे. एका युजरने लिहिलं, “60 वर्षांचा असूनही 40सारखा दिसतो. हँडसमनेस, बायसेप्स, लुक… मेगास्टार सलमान खान म्हणजे वेगळ्याच लेव्हलवर आहे.”दरम्यान, 27 डिसेंबर रोजी सलमान खान आपला 60वा वाढदिवस साजरा करणार आहे. वाढदिवसाआधीच त्याने आपल्या लुकमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली असून, आगामी काळात त्याच्या नव्या चित्रपटांकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.























