"मणक्याला झालेली दुखापत एवढ्या लवकर बरी झाली?"; हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होताच सैफचा फिट लूक पाहून चाहते हैराण
Saif Ali Khan Discharged From Hospital: सैफ अली खानवर चाकूनं हल्ला करण्यात आला होता आणि आता उपचारानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शस्त्रक्रियेनंतर सैफचा लूक पाहून चाहते त्याच्यावर हल्ला झाल्याबद्दल शंका व्यक्त करत आहेत.
Saif Ali Khan Fit Look Surprised Fans: सैफ अली खानला (Saif Ali Khan) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 21 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता त्याला लीलावती रुग्णालयातून (Lilavati Hospital) डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर सैफचा डॅशिंग लूक पाहायला मिळाला. तो आरामात चालताना दिसला आणि हे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. हल्ला झाला त्यावेळी सैफच्या पाठीत अडीच इंचाचा तुकडा रुतला होता, तो शस्त्रक्रिया करुन काढण्यात आला. अशातच सैफला रुग्णालयातून काल (21 जानेवारी) डिस्चार्ज देण्यात आला, शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तीन-चार दिवसांतच सैफ अली खान एवढा फिट दिसत होता, ते पाहून नेटकऱ्यांनी अनेक बाबतींत शंका उपस्थित केली. सैफला अगदी नॉर्मल चालताना पाहून सोशल मीडियावर लोक प्रश्न उपस्थित करत आहेत.
जेव्हा सैफ अली खान रुग्णालयातून त्याच्या घरी सद्गुरु शरणला पोहोचला आणि गाडीतून बाहेर पडला, तेव्हा तो मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी, सैफ अली खाननं पांढरा शर्ट, निळी जीन्स आणि काळा चष्मा घातला होता. तो अगदी नॉर्मल माणसासारखा पटपट चालत त्याच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करताना दिसला. ते पाहुन चाहत्यांना धक्का बसला.
#WATCH | Actor #SaifAliKhan reached his residence after he was discharged from Lilavati Hospital in Mumbai.
— ANI (@ANI) January 21, 2025
Saif Ali Khan was admitted there after being stabbed by an intruder at his residence, in the early morning of January 16. pic.twitter.com/QKIfGH1xqq
जेव्हा सैफ अली खानचा शस्त्रक्रियेनंतर अलघ्या चारच दिवसांत डिस्चार्ज मिळाल्यानंतरचा चालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो पाहून अनेकांना प्रश्न पडले. यावर बोलताना एक युजर म्हणाला की, "वाह, हा कसला जोक आहे?' लीलावतीची जादू अद्भुत आहे. गंभीर दुखापतीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर एखाद्या गार्डन, पार्कमध्ये फिरायला जातोय, असा चालला आहे? हे नक्कीच एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखं वाटतंय. मूर्ख बनवण्याची कला सुरूच आहे."
डॉक्टरों का कहना था कि
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) January 21, 2025
सैफ अली खान की पीठ में 2.5 इंच अंदर तक चाकू घुसा था।
संभवत: अंदर ही फँसा था।
लगातार 6 घंटे ऑपरेशन चला।
यह सब 16 जनवरी की बात है।
आज 21 जनवरी है।
अस्पताल से निकलते ही इतना फिट ?
सिर्फ़ 5 दिन में ?
कमाल है !#SaifAliKhan pic.twitter.com/7tCT9g0jx8
"पाठीच्या मणक्याची दुखापत इतक्या लवकर कशी बरी झाली?"
आणखी एका युजरनं कमेंट केलीय की, "पाठीच्या कण्याला दुखापत झालेला माणूस असा चालतोय?" ते खरोखर असंच होतं की, आणखी काही? दुसऱ्या एका व्यक्तीनं लिहिलं की, "वाह, एखाद्याला चाकूने वार केले आणि त्याच्या पाठीच्या कण्याला झालेली दुखापत इतक्या लवकर बरी झाली? सामान्य जखम बरी व्हायलाही कधी-कधी महिनाभर लागतो."
शिवसेना नेते संजय निरुपम यांनीही प्रश्न उपस्थित
शिवसेना (एकनाथ गट) नेते संजय निरुपम यांनीही सैफ अली खानच्या ए वढ्या फास्ट रिकव्हरीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, "डॉक्टरांनी सांगितलं की, चाकू सैफ अली खानच्या पाठीत 2.5 इंच घुसला होता. कदाचित ते आत अडकले असेल, ऑपरेशन सतत 6 तास चालू राहिले. हे सर्व 16 जानेवारी रोजी घडलं. आज 21 जानेवारी आहे. हॉस्पिटलमधून बाहेर पडताच इतका तंदुरुस्त झाला? फक्त 5 दिवसात? अद्भुत."
Wow😮
— Poonam 🦋🇺🇸🇮🇳 (@itsPPP4747) January 21, 2025
What kind of a joke this is?@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
Surely Lilavati Magic is fantabulous 😂
Does one walk like walking in a park after having surgery for “serious injuries”😒
This sure seems like a filmy plot😐#ArtOfFooling continues….#BoycottBollywood
सैफवर झाल्यात मल्टीपल सर्जरी
सैफ अली खानवर 15 जानेवारी रोजी रात्री उशीरा एका व्यक्तीनं चाकूनं 6 वार केले होते. अभिनेता गंभीर जखमी असल्यामुळे आणि त्याच्या पाठीच्या मणक्यात चाकूचा एक तुकडा रुतल्यामुळे तातडीनं शस्त्रक्रिया करावी लागली अशी माहिती समोर आली आहे. अशातच अभिनेत्याच्या मल्टीपल सर्जरी झाल्या असून त्याला एक महिन्यापर्यंत बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला गेल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
घरात पाय ठेवताच सैफच्या सिक्योरिटीत मोठा बदल, सुरक्षेसाठी 'या' अभिनेत्याची फौज 24 तास पहारा देणार?