एक्स्प्लोर

Saif Ali Khan Attack Updates: सैफ अली खानवर धारदार शस्त्राने वार; पत्नी करिनाने तातडीने आयपीएस अधिकाऱ्याला फोन फिरवला, पण...

Saif Ali Khan Attack Updates: सैफ अली खान हल्ला प्रकरणाचा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामला अटक केल्यानंतर त्याच्याकडून घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.

Saif Ali Khan Attack Updates: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan Attacked Updates Marathi) याच्यावर (16 जानेवारी) च्या मध्यरात्री 2 वाजता प्राणघात हल्ला झाला होता.  या प्रकरणी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम ऊर्फ विजय दासला अटक करण्यात आली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर मोहम्मद शरीफुल इस्लाम बांगलादेशी नागरिक असल्याचं समोर आलं. मुंबईत तो विजय दास म्हणून वावरत होता. 

सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामला अटक केल्यानंतर त्याच्याकडून घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. या चौकशीत मोहम्मद शरीफुल इस्लामकडून विविध धक्कादायक खुलासे केले जात आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्याच्या घटनेनंतर तातडीने पत्नी करिना कपूरने (Kareena Kapoor) एका आयपीएस अधिकाऱ्याला फोन केला होता. मात्र संबंधित आयपीएस अधिकाऱ्याने फोन उचलला नाही. आयपीएस अधिकाऱ्याकडून कोणताच प्रतिसाद नसल्याने करिनाने रुग्णालयात धाव घेतली. 

नेमकं काय घडलं?

आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामकडून सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यानंतर सैफ अली खानवर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर आरोपी मोहम्मद तेथून पळ काढण्यात यश आले. यानंतर करिनाने मध्यरात्री तात्काळ एका आयपीएस अधिकाऱ्याला फोन केला. मात्र आयपीएल अधिकाऱ्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कोणतीच वाट न बघता करिनाने सैफला रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. रुग्णालायत सैफ अली खानला दाखल केल्यानंतर पोलिसांना संबंधित घटनेची माहिती मिळाली. परंतु करिनाने 100 या पोलीस नियंत्रणाशी संपर्क साधला असता तर नाकाबंदी करुन आरोपीला त्याचदिवशी पकडता आले असते, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 

आरोपीने पश्चिम बंगालचे सिमकार्ड वापरल्याचे समोर-

आरोपीने मोहम्मदने सिमकार्ड खरेदी करण्यासाठी पश्चिम बंगालचे सिमकार्ड वापरल्याचे समोर आले आहे. आरोपीने बांगलादेशमधून येऊन काही काळ पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य केले होते. तिथून आधारकार्ड बनवून घेतल्यानंतर त्याने सिमकार्ड खरेदी केले आणि त्यानंतर तो मुंबईला आला. आरोपी मोहम्मदने खुखुमोनी जहांगीर शेख या नावाने सिमकार्ड घेतले होते. तसेच मुंबईतल्या अमित पांडे नावाच्या इसमाने त्याला इथे कंत्राटी पद्धतीने काम मिळवून देण्यात मदत केली असल्याचेही समोर आले आहे. आरोपीने पहिल्यांदा चौकशीत तो कोलकाताचा रहिवाशी असल्याचे सांगितले होते.पोलिसांनी कॉल रेकॉर्ड तपासले असता त्याने बऱ्याच बांगलादेशी नंबरवर कॉल केले असल्याचे समोर आले होते.पोलिसानी आरोपीच्या भावाशी संपर्क करून आरोपीची कागदपत्रे मागवली असता कागदपत्रांनुसार तो बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. हल्ल्यानंतर आरोपी सैफ अली खानच्या घरातून निघाला आणि तिथल्याच एका गार्डनमध्ये तो झोपला होता असेही समोर आले आहे.

संबंधित बातमी:

Saif Ali Khan : हल्लेखोराला पुन्हा सैफच्या घरी नेलं, पोलिसांकडून क्राईम सीन रिक्रिएट; हल्लेखोर मोहम्मदकडून A to Z घटनाक्रम जाणून घेतला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
मोठी बातमी: राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
Embed widget