Saif Ali Khan : हल्लेखोराला पुन्हा सैफच्या घरी नेलं, पोलिसांकडून क्राईम सीन रिक्रिएट; हल्लेखोर मोहम्मदकडून A to Z घटनाक्रम जाणून घेतला
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शहजादची पोलिस कसून चौकशी करत आहेत, ज्यामध्ये अनेक बाबी समोर आल्या आहेत.
Saif Ali Khan Case latest Update : अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्या आरोपीला पुन्हा सैफ अली खानच्या घरी नेण्यात आलं. मुंबई पोलिसांनी क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी हल्लेखोर मोहम्मद शहजाद याला सैफच्या वांद्रे येथील घरी नेलं. सैफ अली खानचं वांद्रेतील पॉश एरियामध्ये सदगुरु शरण या इमारतीत बाराव्या मजल्यावर घर आहे. सैफच्या घरी आरोपी लपूनछपून आला. तो इमारतीत घुसताना कॅमेऱ्यात दिसला नाही, त्यामुळे आरोपी सैफच्या घरी नेमका घुसला कसा, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
हल्लेखोर सैफच्या घरी घुसला कसा?
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला क्राईम सीन रिक्रिएशनसाठी सैफच्या घरी नेलं. सैफ अली खानवर हल्ला करून आरोपी कसा पळाला, वांद्रे स्थानकपर्यंत कसा पोहचला, त्या-त्या ठिकाणी पोलिस आरोपीला घेऊन त्याची माहिती घेत आहेत. सैफच्या इमारतीत प्रवेश करताना आरोपी कुठल्याही कॅमेऱ्यात दिसला नाही, मग तो सैफच्या घरात पोहचला कसा, याचा तपास पोलिस करत आहेत.
सलमान, शाहरुखसह अनेक सेलिब्रिटींची रेकी
सुत्रांच्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या घरात घुसण्याआधी आरोपी मोहम्मद शहजादने अनेक सेलिब्रेटींच्या घराची रेकी केली होती. हल्लेखोर मोहम्मदने वांद्रे परिसरात वास्तव्यास असणाऱ्या अनेक सेलिब्रेटींच्या घराची रेकी केली होती. आरोपीने सैफ अली खानसोबतच बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेता शाहरुख खान यांच्या घरासह अनेक घरांची रेकी केली होती. एका रिक्षातून प्रवास करताना रिक्षाचालकाकडून या सेलिब्रेटींच्या घराबद्दलची माहिती आरोपीने मिळवली होती. सैफ अली खानचे घर आतमध्ये घुसण्यासाठी अधिक सोयीचे वाटल्याने आरोपीने हे घर निवडलं.
आरोपीला पकडणाऱ्या पोलिसांचा सन्मान
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मदला पकडणाऱ्या पोलिसांना सन्मानित करण्यात आलं. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शहजादला पकडण्यासाठी मुंबई पोलिस सलग तीन दिवस झोप न घेता अथक परिश्रम करत होते. वांद्रे पोलिस स्टेशनमधील 75 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात वरिष्ठ मुंबई पोलिस अधिकारी यांच्यासह पोलिस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वांद्रे पोलिस स्टेशनमधील 75 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात सन्मानित करण्यात आलं, त्यांना कौतुक प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :