(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sai Tamhankar : 'I Love You', सई ताम्हणकरच्या पोस्टनंतर ब्रेकअपच्या चर्चांना दुजोरा, आता बायफ्रेंडचीही पोस्ट चर्चेत
Sai Tamhankar : सई ताम्हणकरच्या ब्रेकअपच्या चर्चांनंतर आता तिच्या बॉयफ्रेंडच्या पोस्टने साऱ्यांंच लक्ष वेधून घेतलं आहे.
Sai Tamhankar : सई ताम्हणकरच्या (Sai Tamhankar) एका सोशल मीडिया पोस्टनंतर तिचं वैयक्तिक आयुष्य चांगलच चर्चेत आलं आहे. तिने केलेल्या एका पोस्टमुळे सई सध्या सिंगल असल्याचं स्पष्ट होतंय. पण या सगळ्यावर तिने अद्यापही कोणत्याही प्रकारे स्पष्टपणे आणि अधिकृतरित्या भाष्य केलंल नाहीये. याचदरम्यान आता तिच्या बॉयफ्रेंडचीही पोस्ट चर्चेत आलेली आहे.
सई ताम्हणकर ही मागचे काही वर्ष निर्माता अनिश जोग याला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. सोशल मीडियावरही हे दोघे एकमेकांचे फोटो शेअर करत होते. पण सईच्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांना तिने चांगलच संभ्रमात टाकलं आहे. त्यातच आता अनिशच्याही पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
अनिशची पोस्ट नेमकी काय?
अनिशने त्याच्या चिमुकल्या भाचीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये त्याने म्हटलं की, 10 व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा प्रिय सारु... आय लव्ह यु... दरम्यान अनिशने त्याच्या सोशल मीडियावरुन अद्यापही सईचे फोटो काढलेले नाहीत. पण सईने मात्र तिच्या सोशल मीडियावरुन अनिशसोबतचे फोटो काढून टाकले आहेत.
सईच्या 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण
दरम्यान सईने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यामुळे आता सई आणि अनिशचंही नात संपलं असल्याचं म्हटलं जातंय. सईने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मी स्वत:च्या चॉईसने सिंगल आहे. ही माझी निवड नाही पण आता ही माझी निवड आहे. त्यावर तिने #Truestroy असंही म्हटलं आहे. त्यामुळे सई ताम्हणकर आता सिंगल असल्याचं तिच्या या पोस्टवरुन म्हटलं जातंय.
सई आणि अनिशच्या नात्याच्या चर्चा
अनिश आणि सईचे त्यांच्या मित्र मैत्रीणींच्या लग्नातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याच्या लग्नातील फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या नात्याच्याही चर्चा होऊ लागला. सईच्या काही सिनेमांची निर्मिती ही अनिशने केली आहे. त्यामध्ये गर्लफ्रेंड, धुरळा, वाय झेड या सिनेमांचा समावेश आहे. पण सध्या त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Sai Tamhankar : 'ही माझी निवड नाही पण...', सई ताम्हणकरचं ब्रेकअप? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण