झहीरच्या घरी 'गुड न्युज'! सागरिका-झहीर आई-बाबा बनणार
भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार आहे. सागरिका आणि झहीर आई-बाबा बनणार आहेत. आयपीएलमुळे सध्या दोघेही मुंबई इंडियन्सच्या संघाबरोबर दुबईत आहे. जहीर खान आणि सागरिकाने अद्याप ही गोड बातमी आपल्या चाहत्यांशी शेअर केली नाही.
मुंबई मिररच्या माहितीनुसार सागरिका गर्भवती आहे. रिपोर्टनुसार झहीर आणि सागरिका यांच्या जवळच्या मित्रांनीही दोघेही आई-बाबा बनणार या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सने झहीर खानचा वाढदिवस साजरा केला आणि यावेळी सागरिका घाटगे काळ्या ड्रेसमध्ये दिसली.
अनुष्का आणि विराट देखील आई-बाबा बनणार आहेत. स्वत: विराट कोहली आणि अनुष्का शर्माने फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट करुन आपल्या तमाम चाहत्यांना ही गूड न्यूज दिली होती.
टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिक घाटगे 2017 मध्ये एका घरगुती सोहळ्यात लगीनगाठ बांधली होती. त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला होता.