एक्स्प्लोर

इंडस्ट्रीचं लक्ष केवळ दोन चित्रपटांवर!, 'गुंजन सक्सेना', 'सडक 2'ला नेपोटिझमची गडद किनार

नेपोटिझमची गडद किनार असलेले दोन सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. त्यापैकी पहिला आहे गुंजन सक्सेना - द कारगील गर्ल आणि दुसरा असणार आहे सडक 2. सडक 2 हा चित्रपट 28 ऑगस्टला येणार आहे.

मुंबई : सुशांतसिंह गेल्यानंतर नेपोटिझमवर मोठी चर्चा झाली. बॉलिवूडला नेपोटिझमचा कसा शाप आहे हे वारंवार बोललं जातं आहे. यावरून चिडलेल्या तरुणाईने दिल बेचारा चित्रपटाला डोक्यावर घेतलं. आता नेपोटिझमची गडद किनार असलेले दोन सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. त्यापैकी पहिला आहे गुंजन सक्सेना - द कारगील गर्ल आणि दुसरा असणार आहे सडक 2. सडक 2 हा चित्रपट 28 ऑगस्टला येणार आहे. आता या दोन्ही सिनेमांना लोक कसा प्रतिसाद देतायत ते कळेल काही दिवसांत.
गुंजन सक्सेना या सिनेमाची निर्मिती करण जोहरने केली आहे. तर त्यात जान्हवी कपूर ही बोनी कपूरची मुलगी आहे. दुसरीकडे सडक हा महेश भट्ट यांचा चित्रपट आहे तर त्यात संजय दत्त, अलिया भट, पूजा भट यांच्या भूमिका आहेत. नेपोटिझमवर झडत असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या सिनेमांकडे अवघ्या इंडस्ट्रीचं लक्ष आहे.
इंडस्ट्रीचं लक्ष केवळ दोन चित्रपटांवर!, 'गुंजन सक्सेना', 'सडक 2'ला नेपोटिझमची गडद किनार
सडक या सिनेमानं कमालीची लोकप्रियता मिळवली होती. त्या सिनेमात पूजा भट्ट, संजय दत्त, सदाशिव अमरापूरकर यांच्या भूमिका होत्या. सदाशिव अमरापूरकर यांनी साकारलेली महारानी कमालीची हिट ठरली होती. आता इतक्या वर्षानंतर सडकचा दुसरा भाग येतो आहे. महेश भट्ट या सिनेमाचे दिग्दर्शक असून हा सिनेमा 28 ऑगस्टला डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.
या चित्रपटात संजय दत्त असणार आहे, त्यासोबत अलिया भट, पूजा भट आणि आदित्य रॉय कपूर यांच्या भूमिका आहेत. 1991 मध्ये आलेल्या पहिल्या भागात संजय दत्त आणि पूजा भट्ट ही जोडी रसिकांना दिसली होती. ती जोडी या सिनेमात असणार आहे. खरंतर पहिल्या पोस्टरपासूनच सडक 2 वादात सापडला होता. पहिल्या पोस्टरवरून काही लोकांनी कोर्टात धावही घेतली होती. हिंदू लोकांच्या भावना दुखावल्याचा ठपका यावर ठेवण्यात आला होता. आता दुसऱ्या पोस्टरमध्ये मात्र एक मोठा रस्ता दिसत असून तीन व्यक्तिरेखा या रस्त्यावरून चालताना दिसत आहेत.
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यात महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांच्या नातेसंबंधांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. शिवाय, नेपोटिझममध्ये महेश भट्ट, आलिया भट्ट यांचं नावंही येत होती. याच पार्श्वभूमीवर सडक 2 चित्रपट प्रदर्शित होण्याला महत्व आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर प्रदर्शित झालेल्या दिल बेचारा या चित्रपटाला तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. आता त्यानंतर गुंजन सक्सेना हा चित्रपट नेटफ्लिक्सवर तर सडक 2 हा चित्रपट डिस्ने हॉटस्टार रिलीज होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis Majha Vision Full : शिंदे - दादांच्या बंडाची कहाणी! फडणवीसांनी सगळंच सांगितलं!Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचा वेगवान आढावा : 14 April 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 04 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
Kartiki Gaikwad Pregnancy News :  'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
Marathi Serial Update Zee Marathi Bharat Jadhav : भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक,  'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Embed widget