एक्स्प्लोर

Second Hand : 'सेकंड हँड' चित्रपटातून सचिन दुबाले पाटील यांचं दिग्दर्शकीय पदार्पण, सक्षम कुलकर्णी दिसणार प्रमुख भूमिकेत!

पोस्टरमध्ये दोन हातांनी मिळून झालेल्या बदामाच्या आकृतीमुळे हा चित्रपट प्रेमाविषयी असण्याचा अंदाज आहे. मात्र, चित्रपटाचं पोस्टर लक्षवेधी आहे.

Marathi Movie : चित्रपट दिग्दर्शित करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. त्यानुसार आतापर्यंत अभिनेते, संगीतकार, सिनेमॅटोग्राफर,संकलकांनी चित्रपट केल्याचा इतिहास आहे. त्यात आता कार्यकारी निर्मात्याचीही भर पडत आहे. अर्धा डझन चित्रपटांसाठी कार्यकारी निर्माता म्हणून काम केल्यानंतर, सचिन दुबाले पाटील आता दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसण्यासाठी सज्ज आहेत. ‘सेकंड हँड’ (Second Hand) या चित्रपटातून ते त्यांचा दिग्दर्शकीय प्रवास सुरू करत आहेत.

ब्रदर्स एंटरटेन्मेंट ही निर्मिती संस्था ‘सेकंड हँड’ या चित्रपटाची निर्मिती करत आहे. चित्रपटाची कथा सचिन-विष्णू यांची असून, लेखन डॉक्टर भालचंद्र गायकवाड, अमित बेंद्रे यांचे आहे. अभिनेता सक्षम कुलकर्णी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. "विषय आता खोलात जाणार..." अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. 

पोस्टरमध्ये दोन हातांनी मिळून झालेल्या बदामाच्या आकृतीमुळे हा चित्रपट प्रेमाविषयी असण्याचा अंदाज आहे. मात्र, चित्रपटाचं पोस्टर लक्षवेधी आहे.

मुळचे बीडचे असलेले सचिन दुबाले पाटील कामाच्या शोधात पुण्यात आले. कॉफी शॉपमध्ये काम करायला सुरुवात केली. काम करताना चित्रपटक्षेत्रातील काही जणांशी त्यांची मैत्री झाली. त्यांच्याकडून चित्रपटाविषयी माहिती मिळायला लागली. ‘बुममॅन’ म्हणून चित्रपट क्षेत्रात काम सुरू झाल्यावर पुढे कार्यकारी निर्माता म्हणून आठ ते दहा चित्रपट केले. ‘आटपाडी नाइट्स’, ‘अबक’, ‘हेडलाईन’, ‘बाजार’, ‘खिचिक’ असे उत्तमोत्तम चित्रपट कार्यकारी निर्माता म्हणून त्यांच्या नावावर आहेत.

चित्रपट क्षेत्रात प्रवेश केल्यावर वेगवेगऴ्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळालं. त्यांचं काम पाहताना माझ्याही मनात दिग्दर्शन करण्याचा विचार आला. त्यासाठी आधी चित्रपटाचं तंत्र नीट समजून घ्यायचं ठरवलं. त्यानुसार आता ‘सेकंड हँड’ या चित्रपटातून पहिल्यांदाच दिग्दर्शन करत आहे. घरची चित्रपट क्षेत्राची पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रात प्रवेश झाला आणि चित्रपट दिग्दर्शनापर्यंत येऊन पोहोचलो, याचा आनंद आहे, अशी भावना सचिन दुबाले पाटील यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Trailer Out: कमजोर मनाचे असाल तर जरा लांबच राहा! 'टॉक्सिक'चा ट्रेलर पाहून डोकं सुन्न होईल; रक्ताचा 4 मिनिटं 38 सेकंदांचा थरार!
कमजोर मनाचे असाल तर जरा लांबच राहा! 'टॉक्सिक'चा ट्रेलर पाहून डोकं सुन्न होईल; रक्ताचा 4 मिनिटं 38 सेकंदांचा थरार!
Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Embed widget