Rupali Bhosale : संजनाचं घराचं स्वप्न अखेर पूर्ण झालंच, मेहनतीने झाली हक्काच्या घराची मालकीण
Rupali Bhosale : अभिनेत्री रुपाली भोसले हिने तिच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं असून यासाठी अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
Rupali Bhosale : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून संजना म्हणून भेटीस आलेली अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) ही घरांघरात पोहचली आहे. रुपालीची आई कुठे काय करते या मालिकेतील भूमिका ही नकारात्मक जरी असली तरी ती अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेमुळे रुपाली चांगलीच चर्चेत आली. पण सध्या एका वेगळ्या कारणामुळे रुपाली चर्चेत आहे. रुपालीने तिचं बालपणीचं स्वप्न अखेर पूर्ण केलं असून तिने तिच्या हक्काचं घर घेतलं आहे.
रुपालीने नुकतच तिच्या घराची वास्तुशांत देखील केली. तिच्या घराच्या या कार्यक्रमासाठी काही कलाकार मंडळींनी देखील हजेरी लावली होती. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते रुपालीच्या घराच्या नेमप्लेटने. रुपालीच्या घराच्या नेमप्लेटवर भोसले असं लिहिलं असून त्यामध्ये तिच्या आईवडिलांचं आणि भावाचं नाव आहे.
रुपालीच्या घरी कलाकारांची हजेरी
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरांत पोहचलेला अभिनेता पृथ्वीक प्रताप याने रुपालीसोबतचा फोटो शेअर करत तुझा अभिमान आहे, असं कॅप्शन दिलं आहे. तसेच रुपालीच्या घरी भजनाचा देखील कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यामध्ये सुशांत शेलार हा तल्लिन झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. रुपाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती, ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत संजना ही भूमिका साकारत आहे. मन उधाण वाऱ्याचे', 'कन्यादान' अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
मालिकेतही संजनाचा घरासाठी खटाटोप
सध्या आई कुठे काय करते या मालिकेतही संजना आणि अनिरुद्ध हे घरासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. आप्पा आणि कांचन आईवर ते घर त्यांच्या नावावर करुन घेण्यासाठी दबाब देखील टाकत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सध्या मालिकेत संजना तिच्या हक्काच्या घरासाठी बराच खटाटोप करत असल्याचं पाहायला मिळतंय.