Tejasswi Prakash : रोहित शेट्टीची निर्मिती, ‘बिग बॉस 15’ची विजेती तेजस्वी प्रकाश मराठी चित्रपटात झळकणार!
Tejasswi Prakas Marathi Movie : अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हिने या पर्वाचे विजेतेपद पटकावले आहे. अनेक मालिकांमध्ये झळकलेली ही लोकप्रिय अभिनेत्री लवकरच मराठी चित्रपटात झळकणार आहे.
Tejasswi Prakas Marathi Movie : नुकताच ‘बिग बॉस 15’चा (Bigg Boss 15) महाअंतिम सोहळा पार पडला. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हिने या पर्वाचे विजेतेपद पटकावले आहे. अनेक मालिकांमध्ये झळकलेली ही लोकप्रिय अभिनेत्री लवकरच मराठी चित्रपटात झळकणार आहे.
अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसल्यानंतर या अभिनेत्रीला मराठी इंडस्ट्रीत काम करण्याची सुवर्णसंधीही मिळाली. बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी निर्मित 'स्कूल, कॉलेज आणि लाईफ' या मराठी चित्रपटात ही अभिनेत्री दिसणार आहे. तेजस्वी प्रकाशचा मराठी चित्रपट 24 मार्च 2020 रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन आणि चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले होते. आता पुन्हा या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे.
टीव्ही विश्वातील मोठे नाव
तेजस्वी प्रकाश हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. ‘बिग बॉस 15’ची विजेती बनून तिने अनेकांना आपली दाखल घ्यायला भाग पाडले आहे. मालिकाविश्व ते ‘बिग बॉस 15’पर्यंतचा प्रवास अभिनेत्रीसाठी खूप खास आहे.
तेजस्वी प्रकाश हीचा जन्म 11 जून 1993 रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे झाला होता. अभिनेत्रीचे कुटुंब संगीताशी निगडीत आहे. तेजस्वी प्रकाशने प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. असे म्हटले जाते की, अभिनेत्रीला अभिनयाची खूप आवड होती, म्हणूनच तिने वयाच्या 18 व्या वर्षापासून अभिनयात करिअर करण्यास सुरुवात केली. अभिनेत्री होण्यासाठी तिने अभियांत्रिकी व्यवसाय सोडून अभिनयाच्या जगात प्रवेश केला.
मालिकेतून पदार्पण
तेजस्वी प्रकाशने ‘लाईफ ओके’ टीव्ही चॅनलवर 26 नोव्हेंबर 2012 रोजी प्रीमियर झालेल्या सस्पेन्स-थ्रिलर टीव्ही मालिका ‘2612’द्वारे आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. या टीव्ही मालिकेतील तेजस्वी प्रकाशचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. यानंतर ‘स्वरागिनी’, ‘खतरों के खिलाडी’ यांसारख्या कार्यक्रमातही काम केले.
तेजस्वी प्रकाश टीव्ही शोसह अनेक म्युझिक व्हिडींओंमध्येही दिसली होती. अभिनेत्रीने ‘इंतझार’, ‘सुन जरा’, ‘ए मेरे दिल’, ‘कलाकार’, ‘फकिरा’, ‘मेरा पहला प्यार है’ आणि ‘दुआ है’ यांसारख्या म्युझिक व्हिडींओंमध्ये काम केले आहे.
हेही वाचा :
- Bigg Boss 15: मी हरावी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत स्टुडिओतील लोक प्रार्थना करत होते; विजयानंतर तेजस्वी प्रकाशची पहिली प्रतिक्रिया
- Naagin 6 : तेजस्वी प्रकाश दिसणार नागिनच्या भूमिकेत, 'नागिन 6' मध्ये एंट्री
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha