गोविंदासोबत 'लाल दुपट्टेवाली' गाण्यावर थिरकणारी अभिनेत्री आता कशी दिसते? 32 वर्षानंतरही सौंदर्य कायम
Ritu Shivpuri : गोविंदासोबत 'लाल दुपट्टेवाली' गाण्यावर थिरकणारी अभिनेत्री आता कशी दिसते? 32 वर्षानंतरही सौंदर्य कायम

Ritu Shivpuri : गोविंदाचे 90 च्या दशकतील अनेक सिनेमे आज देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. त्या काळात जवळपास प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा गोविंदासोबत काम करण्याचीच असायची. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रितु शिवपुरी. रितुने 1993 मध्ये आलेल्या आंखें या सुपरहिट चित्रपटात गोविंदासोबत काम केलं होतं. या चित्रपटाला आज 32 वर्षे झाली आहेत, पण रितु शिवपुरीचं सौंदर्य मात्र अजूनही तितकंच तेजस्वी आणि आकर्षक आहे. इतकंच नाही तर तिचे अलीकडचे फोटो पाहून अनेकांनी म्हटलंय की ती पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर दिसू लागली आहे.
अजूनही टिकवून ठेवलेलं सौंदर्य!
इंस्टाग्रामवरील @riitushivpuri या अकाउंटवर रितु शिवपुरीचे काही नविन फोटो शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये ती गोल्डन शिमरी स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये दिसत असून, तिचे मोकळे केस आणि ग्लॅमरस अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अनेक यूजर्स कमेंट करत आहेत की, वयाच्या 50व्या वर्षीनंतरही रितु अतिशय सुंदर दिसते.
रितु शिवपुरी ही सुप्रसिद्ध अभिनेते ओम शिवपुरी आणि अभिनेत्री सुधा शिवपुरी यांची कन्या आहे. जेव्हा तिने आंखें चित्रपट साइन केला, तेव्हा तिचं वय फक्त 17 वर्षं होतं.
View this post on Instagram
यशस्वी झाली नाही रितुची फिल्मी कारकीर्द रितुने 1993 मध्ये आंखें चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील "लाल दुपट्टे वाली" हे गाणं खूप गाजलं. त्यानंतर तिने आर पार, रॉक डान्सर, ग्लॅमर गर्ल, हद कर दी आपने अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र या चित्रपटांना फारसं यश मिळालं नाही आणि त्यामुळे रितुने हळूहळू चित्रपटसृष्टीपासून दूर व्हायचं ठरवलं.
त्यानंतर तिने दागिन्यांचे डिझायनिंग सुरू केलं आणि आता ती आपला ज्वेलरी डिझाईनिंगचा व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहे. रितु सोशल मीडियावर आपल्या ज्वेलरीचे फोटो नियमितपणे शेअर करत असते. याशिवाय, रितु शिवपुरीने टीव्ही मालिकांमध्येही काम केलं असून इस प्यार को क्या नाम दूं – सीझन 3 मध्ये तिने आईची भूमिका साकारली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या























