Riteish Deshmukh : 'जेव्हा माझी मुलं माझ्या हिरोला भेटतात', रितेश देशमुखच्या मुलांची सुनील गावस्करांसोबत 'Fan Moment'
Riteish Deshmukh : रितेश देशमुखने सुनील गावस्करांसोबत त्याच्या मुलांचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
Riteish Deshmukh : भारतात क्रिकेट आणि क्रिकेटरचा चाहता नाही, अशी माणसं क्विचितच. अगदी सर्वसामान्यांपासून ते दिग्गज कलाकारांपर्यंत अनेक क्रिकेटप्रेमी आहेत. सिनेसृष्टी आणि क्रिकेट हे नातं तर फार जुनं आहे. त्यामुळे अनेक कलाकार आणि क्रिकेटर हे एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रीण देखील असतात, त्याचप्रमाणे ते एकमेकांच्या कामाचेही चाहते असतात. असाच एक फॅन स्पेशल क्षण अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने क्रिकेटर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्यासोबत शेअर केला आहे.
रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याची मुलं सुनील गावस्कर यांचा ऑटोग्राफ घेताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओची बरीच चर्चा सुरु आहे. सुनील गावस्करांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत रितेशने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे रितेशचा हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळतंय.
रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काय?
रितेश देशमुखने सुनील गावस्करांचा ऑटोग्राफ घेतानाचा मुलांचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर कॅप्शन देत त्याने म्हटलं की, जेव्हा माझी मुलं माझ्या हिरोला भेटतात. ज्यांनी अनेकांना प्रेरणा दिली अशा असमान्य व्यक्तीला 75 व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला असचं सुदृढ आणि दीर्घायुष्य मिळो. रितेश देशमुखच्या या व्हिडीओने अनेकांची मनं जिंकली आहेत.
सुनील गावस्कर यांच्याबद्दल
75 वर्षीय गावस्कर यांनी भारतासाठी 125 कसोटीत 51.12 च्या सरासरीने तब्बल 10,122 धावा केल्या आहेत. दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 किंवा त्याहून अधिक धावा करणारे ते जगातील पहिले फलंदाज आहेत. गावस्कर यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 34 शतके झळकावली आहेत, ज्यामध्ये चार द्विशतकांचा ही समावेश आहे. याशिवाय त्यांनी 45 अर्धशतकंही केली आहेत. गावस्कर यांनी भारतासाठी 108 एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत आणि 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा ते भाग होते. गावस्कर यांनी वनडेमध्ये 35.14 च्या सरासरीने 3092 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यांनी एक शतक आणि 27 अर्धशतकं झळकावली आहेत.
रितेशचे चित्रपट
तुझे मेरी कसम या चित्रपटामधून रितेशनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.मस्ती, क्या कूल है हम, हे बेबी,धमाल,हाऊसफुल्ल,एक व्हिलन यांसारख्या चित्रपटात त्यानं प्रमुख भूमिका साकारली. तसेच त्याच्या माऊली, लय भारी या मराठी चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.
ही बातमी वाचा :
Marathi Actress : रोज न चुकता अशोक सराफ 'ही' मालिका पाहतात, अभिनेत्रीने शेअर केला अविस्मरणीय दिवस!