एक्स्प्लोर

Genelia Deshmukh : मध्यरात्रीच रितेशने जेनेलियासोबत ब्रेकअप केलं अन्... नेमकं काय घडलं होतं?

Genelia Deshmukh on Husband Riteish: जेनेलिया देशमुखने नुकतच त्यांच्या लग्नाआधीचा एक किस्सा सांगितला आहे.

Genelia Deshmukh on Husband Riteish Deshmukh: बॉलिवुडच्या गोड जोडप्यांपैकी रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे एक जोडपं आहे. दोघेही त्यांच्या केमिस्ट्रीसाठी ओळखले जातात.जेनेलिया आणि रितेश या दोघांचाही मजेशीर अंदाज सोशल मीडियावरुन पाहायला मिळतो.  बराच काळ डेट केल्यानंतर रितेश आणि जेनेलियाने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

पण लग्नाआधी रितेशने जेनेलियासोबत ब्रेकअप केलं होतं. याविषयी जेनेलियाने नुकतच एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे. श्रेया गोधावतला दिलेल्या मुलाखतीत जेनेलियाने तिच्या आणि रितेशच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे. रितेशने कसं ब्रेकअप केलं होतं आणि त्यानंतर जेनेलियाची काय अवस्था झाली होती याविषयी जेनेलियाने सांगितलं आहे. 

रितेशने केलं होतं 'एप्रिल फुल'

जेनेलियाने हा एक प्रँक होता असाही खुलासा केला आहे. यावर तिने म्हटलं की, त्या दिवशी एप्रिल फूल होता.रितेशने मला मेसेज केला की ,  आता आपण एकत्र राहू शकत नाही आणि त्यानंतर तो झोपायला गेला. रितेश उशिरा झोपायचा म्हणून त्याने हा मेसेज रात्री 1 वाजल्यानंतर पाठवला. हा मेसेज पाठल्यानंतर तो झोपला. हा मेसेज मी रात्री 2 वाजता वाचला आणि मग काळजी वाटू लागली. काय झाले ते मला समजलंच नाही. सकाळी 9 वाजेपर्यंत मी वेडी झाले होते. पण तो जेव्हा सकाळी उठला तेव्हा त्याला काहीच आठवत नव्हतं.

मस्करी पडली महागात

जेनेलियाने पुढे म्हटलं की, सकाळी उठल्यावर त्याने मला कॉल केला आणि म्हणाला, हाय कशी आहेस? त्यावर मी त्याला म्हटलं की, आता आपण बोलणं बंद करायला हवं.. त्यावर रितेशने मला काय झालं असं विचारलं...काय चुकीचं झालं आहे का? त्यावर मी म्हटलं की, तू असं म्हणतोयस जसं काही झालंच नाही आहे. त्यावेळी मी त्याने केलेल्या मेसेजची आठवण करुन दिली. तेव्हा त्याच्या लक्षात आलं आणि त्याने म्हटलं की, मी एप्रिल फुल केलं होतं. ती फक्त एक मस्करी होती. त्यानंतर मला जास्तच राग आला. 

View this post on Instagram
 
A post shared by Ritiesh Deshmukh (@ritieshdeshmukh)

ही बातमी वाचा : 

Raj Thackeray : 'मातृभाषेचा हृदयस्थ अभिमान कसा बाळगायचा...', मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अभिनेत्रीने मानले राज ठाकरेंचे आभार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mukhyamantri Sahayata Nidhi: मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Athawale : आरोपीवर कठोर कारवाई व्हावी - रामदास आठवलेParbhani Protest : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जParbhani Protest : परभणी जिल्हा बंदला हिंसक वळण; आंदोलकांनी पेटवले पाईपRahul Patil on Parbhani Protest :  परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mukhyamantri Sahayata Nidhi: मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
India Vs Australia : राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
Parbhani Band : 'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..'  परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..' परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
Embed widget