एक्स्प्लोर

Satara News: कृष्णा नदीत बुडालेल्या रितेश देशमुखच्या सहकलाकाराचा मृतदेह सापडला, पोहतानाच काळाचा घाला; 'राजा शिवाजी'च्या सेटवर खळबळ

Satara News: 'राजा शिवाजी'च्या सेटवर खळबळ माजली आहे. कृष्णा नदीत बुडालेल्या रितेश देशमुखच्या सहकलाकाराचा मृतदेह अखेर सापडला आहे.

Satara News: सातारा: साताऱ्यातील (Satara) संगम माहुली या ठिकाणी एक कलाकार पाण्यात बुडाल्याची दुर्घटना घडलेली. अभिनेता रितेश देशमुख (Rietesh Deshmukh) याच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात काम करणारा कलाकार कृष्णा नदीत (River) बुडालेला. त्याचा मृतदेह अखेर सापडला आहे. सौरभ शर्मा असं मयत कलाकाराचं नाव आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडलेली. 

अभिनेता रितेश देशमुख याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित असलेल्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाचे चित्रीकरण संगम माहुली या ठिकाणी सुरू आहे. या चित्रपटाचं दिवसभरातील शूटिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर चित्रपटात काम करणारा एक कलाकार कृष्णा नदीत (River) बुडाला आहे. सौरभ शर्मा असं या कलाकाराचं नाव असून तो डान्सर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, सौरभ पाण्यात बुडतानाचा व्हिडीओ समोर आलेला. पण त्याला पोहायला येत असल्याची माहिती समोर आली होती.

मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अभिनेते रितेश देशमुख यांचा राजा शिवछत्रपती या चित्रपटाचं चित्रीकरण आटोपल्यानंतर ही दुर्घटना घडली होती. साताऱ्यातील  शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड ट्रेकर्स यांच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू होती.

तब्बल दोन दिवसांनी सापडला मृतदेह 

कृष्णा नदीत पोहोण्यासाठी गेलेला कलाकार पाण्याचा अंदाज न आल्यानं डोहात बुडालेला. चित्रकरण करणाऱ्या टीमकडून स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं सौरभचा शोध सुरू करण्यात आला. मात्र, अंधार पडल्यानं शोधमोहीमेत अडथळा निर्माण होत होता. अखेर, अंधार पडल्यानं शोध मोहीम थांबविण्यात आली. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा एकदा शोधमोहीम सुरू करण्यात आली. अखेर तब्बल 36 तासांनी कलाकाराचा मृतदेह हाती लागला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभ मुहूर्तावर, जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीनं 'राजा शिवाजी' सिनेमाची घोषणा केली होती. तसेच, या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुख करणार असल्याचंही जाहीर केलं होतं. 'राजा शिवाजी' चित्रपटाची घोषणा करताना रितेशने लिहिलं होतं की, 'इतिहासाच्या गर्भात एक असं व्यक्तिमत्व जन्माला आलं ज्याचं अस्तित्व नश्वरतेच्या पलीकडे होते. छत्रपती शिवाजी महाराज... हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती नाहीत. ही 350 वर्षांची भावना आहे, असाधारण शौर्याची ठिणगी आहे... प्रत्येकाच्या हृदयात उगवणारा आशेचा एक महान सूर्य आहे.' सध्या या सिनेमाचे चित्रीकरण वेगाने सुरू असून सर्वांनाच सिनेमाची उत्सुकता आहे. चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होणार असून या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान यांना त्याने साइन केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress CJP Protest: CJPच्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती पोलिसांच्या ताब्यात, VIDEO शेअर करत पत्नीचा संताप
CJPच्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती पोलिसांच्या ताब्यात, VIDEO शेअर करत पत्नीचा संताप
Dr. Amol Kolhe on CJP Laathicharge: 'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
Kriti Sanon : बॉयफ्रेंडसोबत IND vs ENG  पाहायला पोहोचली कृती सेनन; धोनीच्या लेकीसोबतची धमाल चर्चेत
बॉयफ्रेंडसोबत IND vs ENG  पाहायला पोहोचली कृती सेनन; धोनीच्या लेकीसोबतची धमाल चर्चेत
Diljit Dosanjh on CJP Student Protest: शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेला गायक आता CJP आंदोलनात; दिलजीत दोसांझची पोस्ट चर्चेत, म्हणाला...
शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेला गायक आता CJP आंदोलनात; दिलजीत दोसांझची पोस्ट चर्चेत, म्हणाला...

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Embed widget