Riteish Deshmukh : ग्रामीण भागातच जास्त गुणवत्ता, रितेश देशमुखच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष
Riteish Deshmukh : रितेश देशमुखने लातूरमधील क्रिडा कार्यक्रमांना हजेरी लावली असून त्याच्या वक्तव्याने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं.

Riteish Deshmukh : लातूर जिल्हा आणि परिसरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप सुरु होती. या ग्रामीण- टी 10 चा पारितोषिक वितरण सोहळा रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख यांच्या हस्ते पार पडला. लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुल येथे सायंकाळी हे पारितोषिक वितरण करण्यात आलं. त्यांच्या उपस्थितीतच स्पर्धेतील अंतिम सामना झाला आहे. यावेळी स्पर्धकांशी संवाद साधताना ग्रामीण भागातच जास्त गुणवत्ता असल्याचं म्हटलं. त्याच्या या वक्तव्याने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं.
ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही स्पर्धा सुरु करण्यात आली. लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांच्या पुढाकाराने लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण- टी 10 ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. लातूर शहर जिल्ह्यातील सर्व तालुके आणि लोहा-कंधार (जि. नांदेड) मधील सुमारे 300 पेक्षा अधिक संघ सहभागी झाले होते.
पाच हजारांपेक्षा अधिक खेळाडू सहभागी
लातूर तालुक्यातील 42, लातूर शहर 32, उदगीर 41, अहमदपूर 15, चाकूर 22, देवणी 20, जळकोट 18, रेणापूर 23, शिरुर अनंतपाळ 26, औसा 32, निलंगा 14 तर लोहा - कंधार तालुक्यातील 13 असे संघ आणि पाच हजारांपेक्षा अधिक खेळाडूंनी सहभागी झाले होते. तालुक्यात प्रथम आलेल्या 12 संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली. या जिल्हास्तरीय स्पर्धा गेल्या दोन दिवसापासून जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू होत्या यावेळी अभिनेते रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख उपस्थित होते.यावेळी लातूर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी मोठी गर्दी केली होती.
बिग बॉसचं सूत्रसंचालन करणार रितेश देशमुख
बिग बॅास'चे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये 'बिग बॅास'च्या या घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. तसेच बिग बॉसच्या पाचव्या सिजनचा होस्ट हा रितेश देशमुख असणार आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
