तेच कुंकू, तोच ड्रेस, कृष्णराज महाडिकांसोबतच्या फोटोनंतर रिंकू राजगुरुच्या सूचक स्टेटसची चर्चा!
रिंकू राजगुरू आणि कृष्णराज महाडिक यांचा फोटो समोर आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता रिंकू राजगुरूने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून एक फोटो पोस्ट केला आहे.

Rinku Rajguru And Krishnaraaj Mahadik : सैराट चित्रपटातील अर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कोल्हापुरातील भाजपचे नेते धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोनंतर ही चर्चा चालू झाली आहे. त्यानंतर आता रिंकू राजगुरूच्या इन्स्टाग्राम स्टोरीचेही वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
रिंकू राजगुरूच्या स्टोरीची चर्चा
रिंकू राजगुरूने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती पंजाबी ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्या कपाळावर कुंकू दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्या कपाळी अर्धचंद्राच्या आकाराची लाल रंगाची टिकलीही दिसत आहे. रिंकू राजगुरू या फोटोमध्ये नजर खाली झुकवलेल्या स्थितीत दिसत आहे. तिच्या याच सूचक स्टेटसची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
कृष्णराज महाडिक यांनी कोणता फोटो पोस्ट केला होता?
कृष्णराज महाडिक यांनी 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता एक फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये कृष्णराज महाडिक यांच्यासोबत रिंकू राजगुरू दिसत होती. या फोटो त्यांनी खास कॅप्शन दिले होते. "आज अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले," असे कृष्णराज महाडिक यांनी म्हटले होते.
फोटो पाहून वेगवेगळ्या कमेंट्स
हा फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट्स करण्यात आळ्या. काही लोकांनी ही राधा आणि कृ्ष्णाची जोडी वाटतेय, असे म्हटले. तर एका नेटकऱ्याने रिंकूच्या चेहऱ्यावरचे लाजणे काही वेगळेच वाटत आहे, असे कमेंट बॉक्समध्ये म्हटले होते. हा फोटो पाहून रिंकू राजगुरूला तिचा परशा भेटला असंही काही लोक म्हणत होते.
रिंकूने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये नेमकं विशेष काय?
रिंकू राजगुरूने इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमधील ड्रेस आणि कृष्णराज महाडिक यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये रिंकून परिधान केलेला ड्रेस एकच आहे. सोबतच रिंकूने 'अपने रंग मे मुझको रंग दे' या गाण्याचे संगीत जोडले आहे. त्यामुळेच या फोटोचे तिचे चाहते वेगवेगळे अर्थ काढत आहेत.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

